-
एआय मानवी नोकऱ्यांची जागा घेईल की नाही, यावर गेल्या काही वर्षांपासून खूप चर्चा सुरू आहे. अशात चॅट जीपीटीचे प्रमुख सॅम ऑल्टमन यांनी एक टिप्पणी केली आहे.
-
या वर्षीचा अॅक्सेल स्प्रिंगर पुरस्कार मिळाल्यानंतर बोलताना, ऑल्टमन यांनी असा युक्तिवाद केला की एआयइतक्या वेगाने प्रगती करत आहे की लवकरच आपल्याला असे दिसून येईल की यंत्रे मानवांना मागे टाकतील.
-
“अनेक प्रकारे, GPT-5 माझ्यापेक्षा आधीच हुशार आहे आणि मला वाटते की तो इतर बऱ्याच लोकांपेक्षा देखील हुशार आहे”, असे ते म्हणाले.
-
ऑल्टमन यांच्या मते, एआय लवकरच मानवा आवाक्याबाहेरील गोष्टी करण्यासाठी आणि शोध लावण्यासाठी सक्षम होऊ शकते.
-
“पुढील काही वर्षांत, एआयसाठी असे वैज्ञानिक शोध लावणे खूप शक्य होईल, जे मानव करू शकत नाहीत. माझ्या मते, ते असे काहीतरी वाटू लागेल ज्याला आपण सुपरइंटेलिजन्स म्हणू शकतो”, असे ऑल्टमन यांनी स्पष्ट केले.
-
सॅम ऑल्टमन पुढे म्हणाले की, “२०३० पर्यंत आपल्याकडे अत्यंत प्रगत क्षमतेची एआय मॉडेल्स असतील, जी मानव करू शकत नाहीत अशा गोष्टी करण्यासाठी सक्षम असतील. असे झाले नाही तर मला आश्चर्य वाटेल.” ही जरी सकारात्मक बाब असली, तरी ऑल्टमन यांनी हेही अधोरेखित केले की या प्रगतीमुळे अनेक नोकऱ्यांवर गदा येऊ शकते.
-
त्यांनी नमूद केले की, “मी अशा जगाची सहज कल्पना करू शकतो जिथे आज अर्थव्यवस्थेत होणारी ३० ते ४० टक्के कामे भविष्यात एआयद्वारे केली जातील.”
-
या वर्षी वडील झालेल्या ऑल्टमन यांनी, आपल्या मुलाने एआय जगात मोठे होताना कोणती कौशल्ये विकसित करावीत, यावरही विचार व्यक्त केला. त्यांच्यामते अनुकूलता, लवचिकता आणि सर्जनशीलता ही मूलभूत कौशल्ये ठरतील.
-
यावेळी ऑल्टमन यांनी एआय आणि राजकारण यावरही भाष्य केले. ते म्हणाले, “एआय इतक्यातच राष्ट्राध्यक्षांची जागा घेणे शक्य नाही. पण भविष्यात जागतिक नेते निर्णय घेण्यासाठी एआयवर अधिकाधिक अवलंबून राहतील.” (All Photos: Reuters)

Pm Modi : थलपती विजयच्या रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत ३८ जणांचा मृत्यू, मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकीय रॅली…”