-
संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' चित्रपटाला करणी सेनेकडून तीव्र विरोध होत आहे. प्रदर्शनावर बंदी आणण्याच्या मागणीसाठी रणकंदन सुरूच आहे. अनेक ठिकाणी करणी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड आणि जाळपोळ करण्यात येत आहे.
-
आंदोलनकर्त्यांनी गुरुग्राममधील वझिरपूर- पतौडी रोड अडवला. रास्ता रोको करत टायरही जाळले.
-
बऱ्याच मल्टिप्लेक्सना छावणीचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळाले. मॉल्स आणि मल्टिप्लेक्सबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.
-
दिल्ली- जयपूर महामार्गावरही करणी सेनेच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको करण्यात आला.
-
'पद्मावत'विरोधातील निदर्शनांदरम्यान मेरठमधील पीव्हीएस मॉलवर दगडफेक करण्यात आली.
-
राजस्थानमधील चित्तौडगड किल्ला परिसरातही जाळपोळ
-
मल्टिप्लेक्सना छावणीचे स्वरूप

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा