-
पुणे : स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदात सध्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतर पहायला मिळत आहे. कोविड-१९ आजारानं सर्वांवर ही वेळ आणली आहे. पुण्यातून उत्तर प्रदेशातील बनारस येथे जाण्यासाठी निघालेले नागरिक अशा प्रकारे धोकादायक पद्धतीने प्रवास करताना दिसत आहेत. (छायाचित्र – अरुल होरायझन)
-
मोठा धोका पत्करुन हे परप्रांतीय नागरिक सध्या गावाकडं जायला निघाले आहेत.
-
पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर येथून ट्रकच्या टपावर बसून उत्तर प्रदेशकडे निघालेले नागरिक.
-
सुमारे शंभर स्थलांतरित नागरिक या एकाच ट्रकमधून प्रवास करीत आहेत.
-
लहान मुलं आणि महिलांना ट्रकमध्ये बसवण्यात आलं आहे तर बहुतांश पुरुष मंडळी ट्रकच्या टपावरुन प्रवास करीत आहेत.
-
काही महिला देखील टपावरुन प्रवास करण्यासाठी धडपडताना दिसत आहेत.
-
ट्रकमध्ये पुरेशी जागा नसल्याने रणरणत्या उन्हात महिलांनी टपावरुन प्रवास करण्याचा धोका पत्करला आहे.
-
ट्रकच्या टपावर जागा शोधण्यासाठी प्रयत्न करताना काही महिला दिसत आहेत.
-
काही लोक आपल्या चिमुकल्यांनाही ट्रकच्या टपावर घेऊन बसताना दिसत आहे.
-
पुणे शहरात अडकलेल्या मराठवाडा-विदर्भातील नागरिकांनी आता आपापल्या जिल्ह्यांकडे जायला सुरुवात केली आहे.
-
शहराच्या सीमेवरील वाघोली येथे हे नागरिक दररोज जमत आहेत. या ठिकाणी पुणे पोलिसांकडून खासगी बसमधून त्यांची सोय करुन दिली जात आहे. मात्र, त्यासाठी त्यांना सध्या तिप्पट गाडीभाडं आकारलं जात आहे.
-
खासगी बसने घरी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाघोली येथील बस पार्किंग येथे शेकडो नागरिक बसच्या प्रतिक्षित आहेत.
-
या प्रवाशांची वैद्यकी तसापणी करुन त्यांना जागेवरच डॉक्टरांमार्फत वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जात आहे.
-
याच ठिकाणी त्यांचं स्क्रिनिंग करुन त्यांना डॉक्टरांमार्फत वैद्यकीय प्रमाणपत्रही दिलं जात आहे.
-
पुणे पोलिसांमार्फत या नागरिकांसाठी खासगी बसची व्यवस्था करुन दिली जात आहे.
-
भर उन्हात या काही कामगारांनी पार्किंगमध्ये थांबलेल्या ट्रकच्या सावलीचा आसरा घेतला आहे.
-
चालून चालून दमलेल्या या मंडळींनी क्षणभर विश्रांतीसाठी जमिनीवर पाठ टेकवली. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
-
बस सोडण्याच्या प्रक्रियेला वेळ लागत असल्याने तसेच मोठी गर्दी झाल्याने पुरेशी बैठक व्यवस्था नसल्याने महिलांना आणि पुरुषांना अशा प्रकारे बसच्या सावल्यांचा आसरा घेत वेळ ढकलावी लागत आहे.
-
पुणे जिल्ह्यात अडकलेल्या परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी दुसरी श्रमिक रेल्वे सोमवारी रात्री पुणे स्टेशन येथून राजस्थानला रवाना झाली.
-
यावेळी शहर आणि जिल्ह्यातून या नागरिकांना बसने आणि खासगी वाहनांनी रेल्वे स्टेशनपर्यंत आणण्यात आले. यावेळी घरी येत असल्याचा सांगावा देताना एक नागरिक.
-
तब्बल पन्नास दिवस अडकून पडल्यानंतर घरी जाण्याची संधी मिळाल्याने या महिलेला अश्रू अनावर झाले होते.
-
गावाकडं जाण्यासाठी श्रमिक रेल्वे सुटणार असल्यानं जिल्ह्यात अडकलेले लोक लोक मिळेल त्या वाहनांची सोय करुन रेल्वे स्टेशन परिसरात येत होते.
-
प्रवासाला सुरुवात होत असल्याने आपल्या लहान लेकराच्या सुरक्षेसाठी एका बापानं त्यांच्या तोंडाला रुमाल बांधला.
-
राजस्थानातील मजुरांना रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं विशेष बसची सोय केली होती.
-
सध्याच्या स्थलांतराच्या प्रवासामध्ये पालकांबरोबरच लहान मुलांचीही मोठी परवड होताना दिसत आहे. पुणे स्टेशन परिसरात बस पोहोचल्यानंतर त्यामधून भली मोठी समानाची बॅग घेऊन उतरण्याचा प्रयत्न करताना एक चिमुकला.
-
श्रमिक रेल्वेससाठी पुणे स्टेशन परिसरात झालेली मोठी गर्दी
-
रेल्वे गाडीत बसल्यानंतर या मजूर, कामगारांना हायसं वाटलं असणार.

आज गणेश चतुर्थीला ‘या’ ३ राशींवर गणपती बाप्पाची विशेष कृपा! अचानक धनलाभ तर आयुष्यातील अडचणी अखेर होतील दूर