-
महाराष्ट्रात मुंबई प्रमाणे पुणे शहरालाही करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा चांगलाच फटका बसला आहे. करोनाविरुद्ध लढ्यात सरकारी नियमांचं पालन करण्यासाठी सदाशीव पेठेत राहणाऱ्या राजेश मांढरे यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
राजेश मांढरे यांनी आपल्या सदऱ्यावर करोनाविरुद्ध लढ्यात जनजागृतीचे संदेश लिहून लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे.
-
करोना विषाणूच्या आकाराचं हेल्मेट घालून ते आपल्या गाडीवरुन प्रवास करतात, व लोकांना अधिकाधिक सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन करतात.
-
मराठी चित्रपटांच्या नावाचा मोठ्या चलाखीने वापर करत राजेश मांढरे पुणेकरांना करोनाविरुद्ध लढ्यात घरी राहून सहभागी होण्याचं आवाहन करत आहेत. लॉकडाउन काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांसाठी राजेश मांढरे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.
-
राजेश मांढरे हे विश्रामबाग मित्र मंडळाचे कार्यकर्ते आहेत. घरातील वर्तमानपत्र व इतर सामानाच्या सहाय्याने मांढरे यांनी ही कलाकुसर केली आहे.
-
घराबाहेर पडल्यास आपल्याला काय त्रास सहन करावा लागू शकतो याची माहितीही मांढरे आपल्या कामातून पुणेकरांना देत आहेत.
-
पुण्यात आतापर्यंत अनेक रुग्णांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. तरीही शहरात अनेक ठिकाणी लोकं विनाकारण रस्त्यावर येणं थांबवत नाहीयेत. अशांसाठी राजेश मांढरे रोज आपलं सामाजिक कर्तव्य बजावत आहेत.
-
आपल्या नेहमीच्या चौकात गाडी एका ठिकाणी लावली की राजेश लोकांपर्यंत आपला संदेश कसा पोहचेल याचा प्रयत्न करत असतात. राजेश यांच्या कामाचं सध्या सर्वत्र कौतुक होताना दिसतंय.

देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य; “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं आहे, तरीही…”