-
लॉकडाउनमुळे सध्या देशभरातील मजूर, कामगार आपापल्या घऱी जात आहेत. घरी पोहोचण्यासाठी मिळेल त्या मार्गाने हे मजूर प्रवास करत आहेत. (एक्स्प्रेस फोटो – गजेंद्र यादव)
-
अनेकजण तर कित्येक वर्षांनी आपल्या घरी जात आहेत. (एक्स्प्रेस फोटो – कमलेश्वर सिंग)
-
उत्तर प्रदेशात लॉकडाउनमुळे ३० वर्षांनी एक व्यक्ती घरी परतला.
-
-
घर सोडलं त्यावेळी त्यांचं वय ४० होतं आणि लग्नही झालं होतं. घरात आई-वडील, पत्नी आणि तीन मुली होत्या. य सर्वांना सोडून महंगी प्रसाद मुंबईला निघून गेले.
-
तिथे त्यांनी अनेक छोटी-मोठी कामं करत आपल्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली होती. पण ३० वर्षात त्यांनी कधीही आपल्या कुटुंबाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. घरातील लोकांनी त्यांचा शोध घेतला पण काही थांगपत्ता न लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असं वाटलं होतं.
-
महंगी प्रसाद घर सोडून गेल्यानंतर त्यांच्या वडिलांनीच घराची सर्व जबाबदारी घेतली. त्यांनीच तिन्ही मुलींचं लग्न लावून दिलं. काही दिवसांनी महंगी प्रसाद यांच्या आई-वडिलांचं निधन झालं.
-
लॉकडाउनमुळे जेव्हा हातचं काम गेलं तेव्हा महंगी प्रसाद यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. शेवटी परिस्थितीला कंटाळून महंगी प्रसाद यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. ३५०० रुपये देऊन भाजीच्या गाडीतून प्रवास करत ते गोरखपूरपर्यंत पोहोचले आणि तेथून पायी चालत निघाले.
-
गावापासून थोड्या अंतरावर असताना महंगी प्रसाद रस्ता चुकले होते. ३० वर्षांनी येत असल्याने सर्व काही बदललेलं होतं. गावातील एक व्यक्तीने त्यांना पाहिलं आणि ओळखलं. ती व्यक्ती महंगी प्रसाद यांनी गावात घेऊन गेली.
-
महंगी प्रसाद म्हणतात, आपण शहरात पैसा खूप कमावला पण साठवला नाही. आपण एका मुलाचं आणि पतीचं कर्तव्य पार पडू शकलो नाही याचं खूप दु:ख असल्याचं ते सांगतात.
-
आपल्या वडिलांचा मृत्यू झाला आहे असं वाटणाऱ्या मुलीला वडिलांना पाहून अश्रू थांबत नव्हते. महंगी प्रसाद यांनी आता पुढील आयुष्य मुलींसोबतच राहण्याचं ठरवलं आहे.
अगं बाई! साडीतील काकूंचा ठुमका पाहून थक्क झाले नेटकरी; VIDEO पाहून म्हणाले “आंटी तर लहानपणी…..