-
देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्रात सर्वात भयानक परिस्थिती असून देशाती एकूण करोनाबाधित रुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.
-
मागील काही दिवसांपासून दररोज वाढणाऱ्या करोनाबाधित रुग्णसंख्येमुळे पुण्याने मुंबईला मागे टाकलं आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
-
खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यात प्रशासनाने महाविद्यालयांच्या हॉस्टेलचं कोविड सेंटरमध्ये रुपांतर करण्यास सुरुवात केली आहे. (सर्व छायाचित्र – अरुल होरायझन)
-
पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या हॉस्टेलचं कोविड सेंटरमध्ये रुपांतर करण्यास सुरुवात झाली आहे.
-
पुणे जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच करोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे नियोजन संगणकीय प्रणालीव्दारे करण्याचे आदेश उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.
-
हॉस्टेलची साफ-सफाई करताना महिला कर्मचारी
-
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करुन या हॉस्टेलवर खाटांची सोय करण्यात आली आहे.
-
सूर्यप्रकाश, मोकळी हवा रुग्णांना मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
-
स्वच्छतागृहाची साफसफाई करताना महिला कर्मचारी वर्ग…
-
हॉस्टेलमधले नळ व इतर गोष्टी दुरुस्त करवून घेतल्या जात आहेत.

अमाप संपत्ती अन् नफा मिळणार! शुक्र-शनीचा नवपंचम योग या ५ राशींसाठी आहे वरदान! अचानक नशीब बदलणार