-
मुंबईत करोनाबाधित रुग्णसंख्येने शनिवारी १ लाखांचा आकडा ओलांडला आहे. शनिवारी मुंबईत १,१९९ रुग्ण करोनाबाधित आढळले. त्यामुळे रुग्णसंख्या १ लाख १७८ इतकी झाली आहे.
-
मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमधून प्रत्येक भागांत लोकांची करोना चाचणी सुरु आहे. (सर्व छायाचित्र – निर्मल हरिंद्रन)
-
दादर पश्चिम भागात वैद्यकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वयोवृद्ध लोकांसाठी करोना चाचणी कँपचं आयोजन केलं होतं.
-
मुंबईतील रुग्णवाढीचा दर १.३० टक्क्य़ापर्यंत खाली आलेला असला तरी बोरिवली आणि मुलुंडमध्ये मात्र रुग्ण वाढत आहेत.
-
रुग्णसंख्या आणि मृत्यूचं प्रमाण कमी व्हावं यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय विभागाचे कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत आहेत.
-
सर्वात जास्त मृत्यू अंधेरी, जोगेश्वरी पूर्व भागातील ४१६ इतके आहेत.
-
त्याखालोखाल धारावी, माहीम परिसरातील ४१३ मृत्यू आहेत, तर कुर्ल्यात ३८७ मृत्यू आहेत.
-
वयोवृद्ध लोकांना विषाणूची बाधा लवकर होत असल्यामुळे या काळात त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे.

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ