-
करोनाचा विषाणू हवेतून पसरतो यास जागतिक आरोग्य संघटनेने दुजोरा दिला असून वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) प्रमुखांनीही हे मान्य केलं आहे.
-
संग्रहित छायाचित्र
-
सीएसआयआरचे प्रमुख शेखर मांडे यांनी यासंबंधी एक ब्लॉग लिहिला असून सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी समोर येत असलेले पुरावे, दावे-प्रतिदावे यावरुन हवेतून करोना पसरण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे.
-
अशा परिस्थितीत काळजी कशी घेतली जावी याबद्दल सांगताना त्यांनी म्हटलं आहे की, "याचं उत्तर सरळ आणि स्पष्ट आहे ते म्हणजे गर्दी करणं टाळा. सोबतच बंदिस्त असणाऱ्या कामांच्या ठिकाणी हवा खेळती राहील याची काळजी घ्या. तसंच बंदिस्त ठिकाणी मास्कचा वापर केलाच पाहिजे". (Express Photo by Tashi Tobgyal)
-
करोनाचा विषाणू हवेतून पसरतो, याबाबत ३२ देशांतील २३९ वैज्ञानिकांनी जागतिक आरोग्य संघटनेचं लक्ष वेधून घेत पुरावे सादर केले होते.
-
संग्रहीत छायाचित्र
-
शेखर मांडे यांनी करोनाशी लढा देताना मास्क वापरणं सर्वात महत्त्वाचं असल्याचं निष्पन्न होत असल्याचं सांगत हे अनिवार्य असलं पाहिजे असं सांगितलं आहे. (Photo: AP)
-
"एखादी व्यक्ती शिंकली किंवा खोकली तर काही थेंब हवेत सोडले जातात. मोठे थेंब वेगाने जमिनीच्या पृष्ठभागावर टिकतात तर छोटे थेंब बराच वेळ हवेत टिकतात". (Photo: Reuters)
-
"यामुळेच जेव्हा संसर्ग झालेली व्यक्ती शिंकते, खोकते, बोलते तेव्हा हवेत जाणारे थेंब जास्त प्रवास करत नाहीत. पण याउलट छोटे थेंब बराच वेळ हवेत टिकून राहतात," असं शरद मांडे यांनी सांगितलं आहे.
-
"यामुळेच जेव्हा संसर्ग झालेली व्यक्ती शिंकते, खोकते, बोलते तेव्हा हवेत जाणारे थेंब जास्त प्रवास करत नाहीत. पण याउलट छोटे थेंब बराच वेळ हवेत टिकून राहतात," असं शरद मांडे यांनी सांगितलं आहे.

बँक बॅलेन्स डबल..आलिशान कार…घर…७ ऑक्टोबरपासून ‘या’ ४ राशी होणार करोडपती! बुध-यम केंद्र राजयोग स्वप्न पूर्ण करणार