डॉक्टर आणि इंजिनिअर UPSC परीक्षा देऊन आपलं नशीब अजमावतात. अनेकांना यामध्ये यश मिळवण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न करावा लागतो. पण, मेहनत लगन आणि अभ्यासाच्या बळावर काही जणांना पहिल्या प्रयत्नातच यश मिळते. आजच्या सक्सेस स्टोरीमध्ये आपण आयएएस डॉ. अर्तिका शुक्ला यांची कहानी पाहणार आहोत…. आर्तिका पहिल्याच प्रयत्नात आयएएस झाली. याचं सर्व श्रेय आर्तिका आपल्या दोन्ही भावांना आणि आई-वडिलांना देते. आधिकारी असणाऱ्या दोन्ही भावांच्या शिकवणीमुळेच आर्तिका आज आयएएस आहे. आयएएसची तयारी करताना आर्तिकाला कोणतीही शिकवणी लावायची गरज भासली नाही. आधिकारी असणाऱ्या दोन्ही भावांनी वेळोवेळी दिवसरात्र आपल्या बहिणीला शिकवलं, टिप्स दिल्या. भावांनी दिवसरात्र केलेल्या मदतीमुळेच आर्तिका पहिल्याच प्रयत्नात आयएएस झाली. दोन्ही भाऊ UPSC देऊन वेगवेगळ्या पदावर आणि वडील डॉक्टर असल्यानं घरातूनच UPSCच्या परीक्षांचं तिला मार्गदर्शन मिळालं. अर्तिकाचं शालेय शिक्षण वाराणसीत झालं. अर्तिकाचा मोठा भाऊ गौरव २०१२ मध्ये आयएएस झाला होता. तर दुसरा भाऊ उत्कर्षही यूपीएससी परीक्षा पास होऊन आयआरटीएसमध्ये आधिकारी आहे. पहिल्यापासूनच शाळेत पहिल्या नंबरात असणाऱ्या अर्तिकाला हाती घेतलेलं काम अत्यंत कुशल आणि हुशारीनं पूर्ण करण्याची सवय होती. आयएएस होण्यासाठी ही गोष्ट तिला उपयोगी पडली. वाराणसीची आर्तिका म्हणते, आयएएस होण्यासाठी १५ किवां १६ तास अभ्यास करण्याची गरज नाही. योग्य नियोजन करुन पाच ते सहा तास अभ्यास केल्यानंतरही परीक्षेत यश मिळतेच. दोन्ही भावांच्या मार्गदर्शनाखाली २०१५ च्या UPSC परीक्षेत आर्तिकानं देशात चौथा क्रमांक मिळवला. वर्षभराच्या तयारीत अर्तिकानं हे यश कसं खेचून आणलं. अर्तिकानं वर्षभराचं नियोजन केलं होतं. प्री परीक्षेसाठी दररोज तीन तास तर मुख्य परीक्षेसाठी दररोज एक तास अभ्यास करत असे. त्यानंतर एक तास GKसाठी दररोज आर्कितानं दिला. दहावीपर्यंत गणित आणि इंग्रजी आपण नीट अभ्यास केला तर प्री परीक्षेत अॅप्टीट्यूट टेस्ट पास होणं कठीण नाही, असे आर्किता सांगते. UPSC ची परीक्षा देताना घाबरून जाऊ नका या भीतीमधून स्वत:ला कायम सकारात्मक प्रेरणा द्या असा सल्ला अर्तिका शुल्काने दिला आहे. -
आर्तिकाचं यश नव्या पिढीपुढे प्रेरणा निर्माण करणारे आहे….
-
आर्तिका आज, आनेकांसाठी आदर्श आहे.
-
सर्व फोटो artikashukla.ias या इन्स्टाग्राम पेजवरुन घेतले आहेत.

Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव कोसळले, १० ग्रॅमची किंमत पाहून आताच सराफा बाजार गाठाल!