-
५ ऑगस्ट रोजी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यानंतर संपूर्ण देशभरात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी श्रीराम नामाचा जल्लोष केला तर महिला कार्यकर्त्यांनी फुगडी घालून आनंद साजरा केला. (सर्व फोटो – आशिष काळे)
-
रामाच्या मूर्तीसमोर शंखनाद करताना कार्यकर्ते…
-
सध्या करोनामुळे देवळं बंद आहेत…तरीही पुण्यात वयोवृद्ध महिलांनी मंदिराच्या पायऱ्यांवर बसून भजनं म्हणत भूमिपूजनाचा सोहळा आपल्या पद्धतीने साजरा केला.
-
कालचा दिवस सर्वांसाठी खूप खास होता…मग एक सेल्फी तर झालाच पाहिजे ना???
-
लहान मुलंही या सोहळ्यात सहभागी झाली होती.
-
राम-लक्ष्मणाच्या वेशात सोहळ्यामध्ये सहभागी झालेले दोन चिमुरडे
-
रामाचा निस्सिम भक्त अशी ओळख असलेला हनुमानही एका लहानग्याने साकारला होता…
-
संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण पहायला मिळालं.

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा