-
सध्या संपूर्ण जगाचं लक्ष करोनावरील लसीकडे लागलं आहे. (Photo: Reuters)
-
रशियाने करोनावरील लस शोधली असल्याचा दावा केला असला तरी त्यांनी चाचण्यांची प्रक्रिया पूर्ण केल्याची टीका होत आहे. (Photo: Reuters)
-
दुसरीकडे करोना लस अद्यापही विकसित होण्यापूर्वीच चीनने देशवासियांना लसीचे डोस देण्यास सुरुवात केली आहे. (Photo: AP)
-
Sinopharm कडून ही लस विकसित केली जात असून संयुक्त अरब अमिराती येथे तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सुरु आहे. (Photo: AP)
-
मात्र चीनमधील वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सरकारी टीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलैपासून आपत्कालीन वापराच्या अधिकृततेखाली आधीपासूनच लोकांना लस देण्यात येत आहे. (Photo: Reuters)
-
वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या करोना लस विकसित कार्यक्रमाचे प्रमुख झेंग झॉन्गवी यांनी सांगितलं आहे की, २२ जुलैपासूनच वैद्यकीय कर्मचारी आणि काही सरकारी कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे.
-
आगामी महिन्यांमध्ये अजून लोकांना ही लस दिली जाणार आहे. (Photo: AP)
-
थंडीच्या काळात करोनाचा प्रसार होऊ नये यासाठी आम्ही विशेष कार्यक्रम आखण्याची योजना करत आहोत असं झेंग झॉन्गवी यांनी सांगितलं आहे. (Photo: Reuters)
-
काही विशेष ग्रुपमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न असेल असंही झेंग झॉन्गवी यांनी म्हटलं आहे.
-
पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांसाठी संमती देण्यात आलेली लस आणि ही लस वेगळी आहे. (Photo: Reuters)
-
CanSino Biologics आणि अकॅडमी ऑफ मिलिटरी मेडिकल सायन्सकडून मर्यादित वापरासाठी या लसीला संमती देण्यात आली.
-
आतापर्यंत ही लस किती जणांना देण्यात आली याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
-
त्यामुळे सर्वसमान्यांसाठी संमती देण्यात आलेली Sinopharm पहिली लस ठरली आहे. (Photo: AP)
-
सध्या फक्त काही विशेष ग्रुपला ही लस दिली जाणार आहे.
-
करोनाचा फैलाव होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या चीनने दिलेले करोना लसीचे डोस किती प्रभावी ठरतात याकडे आता जगाचं लक्ष लागलं आहे (Photo: Reuters)

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट