-
संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या शहरांना करोना विषाणूचा विळखा अद्याप कायम आहे. करोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांना अखेरचा निरोप देतानाही परिवारातील लोकांना नियमांचं पालन करावं लागत आहे. पुण्यात ख्रिश्चन धर्मगुरुंनाही अंत्यविधी करण्यासाठी खास पीपीई किट व मास्क घालून तयार व्हावं लागतंय. (सर्व छायाचित्र – अरुल होरायझन)
-
महाराष्ट्रात पुणे शहराला करोनाचा खूप मोठा फटका बसला आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी परिवारातील एकाच सदस्याला अंत्यविधीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येत आहे.
-
अंत्यविधी करणाऱ्या धर्मगुरुंनाही आधी अशा पद्धतीने तयार व्हावं लागतं.
-
प्रत्येक व्यक्ती आपापल्या धर्मातील नियम आणि रितींप्रमाणे आपल्या प्रिय व्यक्तीला अखेरचा निरोप दिला जाईल याची काळजी घेतो आहे.
-
पुण्यात अनेक ठिकाणी प्रशासनाकडून करोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत.
-
धर्मगुरु अंत्यविधी करत असताना सर्व नियमांचं पालन होईल याची काळजी घेत आहेत.
-
गेल्या काही महिन्यांमध्ये करोनामुळे अनेक घरं उध्वस्त झाली, अनेक घरांतील तरुण मुलं, आई-वडील, वयस्कर व्यक्तींना करोनामुळे आपले प्राण गमवाले लागले.
-
पुण्यातील अनेक स्मशानभूमींवर मृतदेहाची हेळसांड होऊ नये यासाठी कोल्ड स्टोअरेज रुमची सोय करण्यात आली आहे.
-
सध्या करोनावर औषध तयार करण्याचं काम प्रगतीपथावर आहे.
-
त्यामुळे लवकरात लवकर हे औषध सापडू दे आणि या महामारीतून जगाची सूटका होऊ दे अशी प्रार्थना सध्या सर्वजण करत आहेत.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट