-
पुणे शहराला अद्याप करोना विषाणूचा विळखा कायम आहे. अनलॉकच्या माध्यमातून शहरांतले व्यवहार आता खुले झाले असले तरीही रुग्णसंख्येत होणारी वाढ थांबत नाहीये. बुधवारी पुणे महापालिकेने गुरुवार पेठ हा भाग मिनी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला. (सर्व छायाचित्र – आशिष काळे)
-
या भागात पत्र्याचे शेड टाकून नागरिकांना बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
-
पुण्यात गुरुवारी दिवसभरात १ हजार ९१६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले.
-
पुण्यातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्येने आता १ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
-
आतापर्यंत अडीच हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी पुण्यात करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. प्रत्येक दिवशी मृतांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे पालिकेने पुन्हा एकदा रुग्ण वाढत असलेल्या भागांत निर्बंध घालण्याचं ठरवलंय.

Video: ‘गौतमी पाटीलला उचलणार की नाही?’ चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन; अपघातग्रस्त रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर, कुटुंबाचे आंदोलन