-
पुणे शहरात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होते आहे. अनलॉक काळात प्रशासनाने नागरिकांवरचे निर्बंध उठवले असले तरीही काही पुणेकर हे मास्क न घालता घराबाहेर पडत आहेत. अशाच काही बेजबाबदार नागरिकांमुळे शहराची रुग्णसंख्या आटोक्यात येत नाहीये. (सर्व छायाचित्र – अरुल होरायझन)
-
मास्कशिवाय घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांविरोधात पोलिसांनी खास मोहीम हातात घेतली आहे.
-
मंगळवारी सोलापूर महामार्गावर भैरोबा नाला परिसरात पुणे पोलिसांचं एक पथक मास्कशिवाय घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत होतं.
-
मास्कशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलीस अधिकारी कारवाई करताना दिसले.
-
पुणे शहरात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येने १ लाखाचा टप्पा ओलांडला असून प्रत्येक दिवशी पुणेकर या विषाणूशी लढताना आपले प्राण गमावत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ