-
पुणे शहरात वाढत्या करोना रुग्णसंख्येवर आळा बसावा यासाठी आरोग्य यंत्रणा व पालिकेचे इतर कर्मचारी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. परंतू अद्याप त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही. (सर्व छायाचित्र – अरुल होरायझन)
-
पुणे महापालिकेच्या सफाई विभागात काम करणारे कर्मचारी सध्या अक्षरशः आपला जीव मूठीत धरुन काम करत आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये दररोज तयार होणारा कचरा आणि उरलेलं अन्न हे कर्मचारी तसंच उचलत आहेत.
-
शिरोळे रोड परिसरातील रस्त्यावर गुरुवारी हे कर्मचारी सेंटरमध्ये तयार झालेला कचरा उचलत होते.
-
अनेक कर्मचाऱ्यांकडे मास्क, ग्लोव्ह्ज, पीपीई किट अशी कोणतीही साधनं नव्हती…तरीही आपलं काम ही मंडळी अविरतपणे करत होती.
-
पुण्यात आणीबाणीसदृष्य परिस्थिती निर्माण झालेली असताना, महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांकडे असं दुर्लक्ष करणं योग्य नाही असा सूर पुणेकरांमध्ये उमटतो आहे.
-
अशा पद्धतीने सामान उचलताना या कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होण्याची शक्यता असते.
-
परंतू सध्याच्या खडतर काळात, घर चालवण्यासाठी काम करणं गरजेचं बनलंय. त्यामुळे हे कर्मचारी हा धोका पत्करुनही आपलं काम करतायत.

नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ