-
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" अभियानांतर्गत ठाण्यात आरोग्य तपासणी मोहीम सुरू आहे. ( सर्व फोटो सौजन्य : दीपक जोशी )
-
यामध्ये आतापर्यंत १ लाख ४० हजार ९३६ कुटुंबाची पूर्णपणे तपासणी केली गेली आहे. आरोग्य सर्वेक्षण झाल्याचे प्रमाण ३२.०१ टक्के आहे.
-
महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी नागरिकांना या आरोग्य तपासणी अभियानास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
-
राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढत आहे. मात्र असे जरी असले तरी करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
-
राज्यभरात अनेक शहरांमध्ये आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन तपासण्या देखील केल्या जात आहेत. करोना संसर्गास आळा घालण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने सर्व नियमांचे पालन करण्याचे वेळोवेळी आवाहन केले जात आहे.

नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ