-
अनलॉकच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शहरं आता पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही अद्याप करोनाचं संकट कायम आहे.
-
पुण्यात करोना चाचणी केंद्रांवर आजही स्वॅबचे नमुने देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली पहायला मिळाली. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
कात्रज परिसरातील राजीव गांधी Zoological Park मध्ये नवीन करोना चाचणी केंद्र स्थापन करण्यात आलंय. इथे स्वॅबचे नमूने देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं यासाठी खास सोय करण्यात आली आहे.
-
पुण्याच्या प्रत्येक नागरी वस्त्यांमध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी जाऊन चाचण्या करत आहेत.
-
पुणे शहरात शनिवारी १ हजार ५५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले.
-
शनिवारी तब्बल ३८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत पुण्यात मृतांची संख्या साडेतीन हजाराच्या वर गेली आहे.
-
करोनावर उपचार घेणार्या १ हजार २८६ रुग्णांची तब्येत ठीक झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
-
काल दिवसाअखेरीस १ लाख २८ हजार ९२५ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.
-
देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील करोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत आहे.
-
दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात नव्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढणारी करोनाबाधितांची संख्या आता काहीशा प्रमाणात कमी होताना दिसत आहे.
-
काल दिवसभरात राज्यात १४ हजार ३४८ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २७८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल