-
पुणे : लॉकडाउनच्या सहा महिन्यांच्या कालावधीनंतर अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील हॉटेलं आजपासून सशर्त सुरु झाली. मात्र, पहिल्याच दिवशी याला ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. (सर्व छायाचित्रे – पवन खेंगरे)
-
पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज रोडवरील विविध रेस्तराँमध्ये ग्राहक राजाचे औक्षण करुन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
-
वाडेश्वर या साऊथ इंडियन रेस्तराँमध्ये ग्राहकांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
-
या रेस्तराँ आणि हॉटेलांमध्ये प्रवेश करतानाच बाहेर ग्राहकांसाठी सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
-
त्याचबरोबर आत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाच्या शरीरीचे तापमानही स्कॅनरच्या माध्यमातून तपासले जात आहे.
-
सुरक्षा रक्षकांपासून हॉटेलांमधील वाढपी आणि कर्मचाऱ्यांद्वारे ग्लोव्ह्ज, मास्क यांचा वापर केला जात आहे.
-
कोविडच्या नियमानुसार फिजिकल डिस्टंसिंगसाठी ५० टक्केच ग्राहकांना रेस्तराँमध्ये प्रवेश दिला जात असून एकाआड एक टेबल उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
-
पुणेकर खवय्यांनी पहिल्या दिवशी काहीसा थंड प्रतिसाद दिला असला तरी अनेकांनी आपल्या नेहमीच्या खानावळीत आणि रेस्तराँमध्ये मनसोक्त जेवण्याचा आनंदही लुटला.
-
कोविडच्या भीतीमुळे लॉकडाउनदरम्यान आपापल्या राज्यात परतलेले परप्रांतीय हॉटेल कामगार हॉटेलांना परवानगी नसल्याने अद्यापही परतलेले नाहीत. त्यामुळे अनेक प्रसिद्ध हॉटेल्स आजही बंद होती. मात्र, येत्या काही दिवसांत ती देखील सुरु होतील.
-
ग्राहकांच्या आणि एकूणच सार्वजनिक आरोग्यासाठी आता हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये स्वच्छतेवर अधिक भर देण्यात येत आहे.
-
काही हॉटेलांमध्ये तर प्रत्येक टेबलावर सॅनिटायझरच्या बाटल्यांचीही सोय करण्यात आली आहे.
-
अनेक नागरिकांनी सहकुटुंब आवडत्या हॉटेलमध्ये जाऊन भरपेट लज्जतदार जेवणाचा आनंद घेतला. एकूणच राज्यातील हॉटेलं खुली झाल्याने आता प्रवाशांची सर्वाधिक सोय झाली आहे. कारण लांबच्या पल्ल्यासाठी घराबाहेर पडायचं म्हटलं तर वाटेत त्यांचे जेवणाचे प्रचंड हाल होत होते.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट