-
पुणे शहराला अजुनही करोना विषाणूचा विळखा कायम आहे. लॉकडाउन काळात होणारं आर्थिक नुकसान लक्षात घेऊन प्रशासनाने शहरातील व्यवहार आता हळुहळु सुरु केले आहेत. पण शहरात दररोज करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत जात असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचं आवाहन सरकारी यंत्रणा वारंवार करत आहेत.
-
Pune Cantonment Board आणि पुणे पोलीसांनी शहरातील मार्केटयार्डात नियमांचा भंग करुन मास्क न लावता विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. (सर्व छायाचित्र – आशिष काळे)
-
सोशल डिस्टन्सिंग आणि आजुबाजूच्या परिसरात स्वच्छता या महत्वाच्या गोष्टी नागरिकांनी पाळणं महत्वाचं आहे.
-
तरीही काही जणं या संकटातून धडा घेताना दिसत नाहीयेत. रस्त्यावर थुकणाऱ्या लोकांनाही यावेळी दंड आकारण्यात आला.
-
सरकारने नियमांचं पालन करुन सर्व गोष्टींना परवानगी दिली आहे. त्यामुळे आजुबाजूला निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या नियमांचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे कारण करोना अजुन गेलेला नाही.

उच्च न्यायालयाकडून सातारा, पालघर जिल्हा सत्र न्यायाधीश बडतर्फ