-
पुणे शहराला करोना विषाणूच्या प्रादूर्भावाचा मोठा फटका बसला. आजही शहरात दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतू लॉकडाउनमध्ये होणारं आर्थिक नुकसान लक्षात घेता प्रशासनाने शहरातील व्यवहार आता हळुहळु सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील PMPML च्या बसही सुरु करण्यात आल्या आहेत.
-
शहरात आणि राज्यातील करोनाची परिस्थिती पाहता PMPML चे कर्मचारी दररोज सॅनिटायजेशनचं काम करत असतात. (सर्व छायाचित्र – आशिष काळे)
-
डेक्कन जिमखाना परिसरातील बस स्टँडचं सॅनिटायजेशन करताना कर्मचारी…
-
प्रत्येक दिवशी दोन तासांच्या फरकाने बस स्डँटचा परिसर सॅनिटाईज केला जात आहे.
-
शहरात आता गर्दी वाढत असल्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे, त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेचे सर्व नियम पाळणं प्रशासनाने बंधनकारक केलं आहे.
-
सर्वसामान्य पुणेकरांचा प्रवास सुखरुप व्हावा म्हणून कर्मचारी दररोज मेहनत घेत आहेत.

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…