-
ठाणे : राज्यात सोमवारपासून शाळा सुरु होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेतील शिक्षकांना करोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. (सर्व छायाचित्रे – दीपक जोशी)
-
या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या कोविड चाचणी केंद्रात अनेक शिक्षकांनी आपल्या चाचण्या करु घेतल्या.
-
करोना महामारीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. मात्र, त्यासाठी अनेक मार्गदर्शक नियमावली तयार करण्यात आल्या आहेत.
-
या मार्गदर्शक नियमावलींचे पालन करणे हे शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांनाही बंधनकारक असणार आहेत.
-
करोना लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षणही सुरु करण्यात आलं होतं. मात्र, त्याला अनेक बंधन असल्याने त्याचबरोबर हळूहळू सर्वकाही पूर्वपदावर येत असल्याने शाळाही सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
-
शाळा सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही काळजीची बाब असली तरी नियमांचे योग्य प्रकारे पालन झाल्यास करोनाच्या धोक्यापासून बचाव करता येऊ शकतो.
-
या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळेत रुजू होणाऱ्या सर्व शिक्षकांना करोनाची चाचणी करुन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Raksha Bandhan 2025: रक्षाबंधनाला ‘या’ ३ राशींवर शनीची कृपा! साडेसाती सुरू असूनही मिळेल प्रचंड संपत्ती, अचानक धनलाभ तर नशिबी मोठं यश