-
काही महिन्यांपासून करोनाच्या कोडींत सापडलेल्या जगभरातील नागरिकांना ब्रिटनमध्ये आशेचा किरण दिसला. ब्रिटनने फायझर बायोएनटेकच्या लशीला परवानगी दिली. ब्रिटनमध्ये लसीकरण सुरू होणार असलं, तरी करोनावर लस आली या बातमीनं करोनाविरोधातील लढाईला बळ दिलं आहे. (संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)
-
भारतातही करोना लस निर्मितीचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दौरा करून देशात तयार होत असलेल्या लशींचा आढावा घेतला. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत भारतात लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
-
देशात लस आल्यानंतर वितरण कसं करायचं याची तयारीही सरकारनं सुरू केली आहे. त्यामुळे प्रत्येकाला करोनाची लस मिळणार असं बोललं जात होतं. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहिती पुन्हा चलबिचल सुरू झाली आहे.
-
काय म्हणालं आरोग्य मंत्रालय? आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं की, प्रत्येक भारतीयाला लस देण्याबद्दल सरकारकडून म्हटलं गेलेलं नाही. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी हे जोर देऊन स्पष्ट केलं. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असाच होता की, लस आल्यानंतर प्रत्येक नागरिकाला दिली जाणार नाही.
-
प्रत्येक भारतीयाला लस का मिळणार नाही? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर या प्रश्नाच उत्तरही समोर आलं. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरचे अध्यक्ष डॉ. बलराम भार्गवा यांनी प्रत्येकाला लस का दिली जाणार नाही यांच उत्तर दिलं.
-
"सरकारचा उद्देश करोना व्हायरसच्या प्रचाराची साखळी तोडणं हे आहे. करोना होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या नागरिकांना जर आपण करोना लस दिली आणि आणि प्रसार रोखण्यात यशस्वी ठरलो, तर देशातील पूर्ण लोकसंख्येला लस देण्याची गरज पडणार नाही," असं भार्गवा म्हणाले.
-
केंद्र सरकार लसीकरणाबद्दल दिलेल्या माहितीनंतर हे स्पष्ट झालंय की, ज्यांना संसर्ग होण्याची सर्वाधिक भीती आहे. अशानाच लस देण्यात प्राधान्य दिलं जाणार आहे. संसर्गाची भीती असलेल्या लोकांच्या समूहाला भार्गवा यांनी 'क्रिटिकल मास' म्हटलं आहे.
-
सरकारनं प्रत्येक नागरिकाला लस दिली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं असलं, तरी अनेक प्रश्न आणि आव्हान यानंतर निर्माण झाले आहेत.
-
महत्त्वाचा मुद्दा असा की, सरकार 'क्रिटिकल मास'मध्ये येणाऱ्या म्हणजे करोनाचा प्रसार ज्यांच्यामाध्यमातून होऊ शकतो अशा नागरिकांची ओळख कशी पटवणार. देशभरात हे करावं लागणार असल्यानं हे अधिक गुंतागुंतीचं असणार आहे.
-
२०२१ सुरूवातीच्या काही महिन्यात भारतात करोनाच्या लसीकरणाला सुरूवात होऊ शकते. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत ३० कोटी भारतीयांना लस देण्याची परिस्थिती देशात असेल, असं ते म्हणाले आहेत. मात्र, आता सरकारला आधी क्रिटिकल मास असणाऱ्या नागरिकांना आधी शोधावं लागणार आहे. (संग्रहित छायाचित्र/AP)

Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल