बरेच दिवस रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील. मागे झालेली कुचंबणा दूर होईल. नोकरदार व्यक्तींनी ठरवलेल्या चांगल्या कल्पना राबविण्यात यश मिळेल. वरिष्ठांसमवेत झालेला संभ्रम दूर होईल, अनुकूलतेचे प्रमाण वाढेल. गुंतवणुकीतून खरेदीचा योग्य उपयोग करून घेता येईल, अचूकपणे पर्याय निवडा. आगामी काळासाठी केलेली तरदूत योग्य ठरेल. व्यापारी लोकांशी जोडलेले संबंध उपयुक्त ठरतील. पत्रव्यवहारातून कामे होतील. मात्र बँक प्रकरणात घाई करण्याची गरज नाही. स्वतच्या मनाला आवर घालून खर्चावर नियंत्रण मिळवा. सामाजिक क्षेत्रात आव्हानात्मक स्थितीचा विचार करा. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद वाढवू नका. खाण्यापिण्याचा समतोल साधा. >> शुभ दिनांक : २०, २१ >> महिलांसाठी : पूर्ण सकारात्मकपणे कामात उतरा. लाभस्थानातील चंद्र मंगळाचा शुभयोग धाडस वाढवणारा ठरेल. प्रयत्न आणि वेळेचे बंधन यांची सांगड घातल्यास सप्ताह उत्तम राहील. स्वत: घेतलेले निर्णय अचूक असतील. इतरांच्या सल्ल्याचा फक्त ऐकून घेण्यासाठी वापर करा. त्यावर स्वत:चेच मत निर्माण करा. नव्या नोकरीची दिशा मिळेल. कामातील उत्साह वाढणारा असेल. व्यावसायिकदृष्टय़ा मोठी उडी यशस्वी ठरेल. हाती घेतलेले काही काम सहजपणे पूर्ण करू शकाल. उधारी वसुली मनासारखी होईल. अनावश्यक गोष्टींचा खर्च कमी केल्यास नियोजन यशस्वी होईल. सामाजिक ठिकाणी व्यासपीठावरून आपला बोलबाला वाढेल. मित्रांच्या बाबतीत जास्त वाहवत जाऊ नका. मुलांना वेळीच जागे करा. कौटुंबिक जीवनात सप्तरंगी चित्र रेखाटता येईल. शारीरिकदृष्टय़ा योगसाधना महत्त्वाची ठरेल. >> शुभ दिनांक : २२, २३ >> महिलांसाठी : नवे काही शिकण्याचा फायदा होईल. चंद्र ग्रहाचे भ्रमण भाग्यस्थानाकडून लाभस्थानाकडे होत आहे. प्रलंबित कामाला वेग येईल. सेवकवर्गाला कष्टाचे चीज होईल. वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडाल. व्यापार-उद्योगधंद्यातील समस्यांवर तोडगा निघेल. अनपेक्षित येणी वसूल होतील, नवीन उद्योगधंद्याला कलाटणी मिळेल. छोटय़ा-मोठय़ा तांत्रिक अडचणी कमी होतील. भागीदारी व्यवसाय लाभदायक ठरेल. सांपत्तिकदृष्टय़ा परिस्थितीत बदल होतील. राजकीय क्षेत्रातील वरिष्ठ व्यक्तींशी नम्रतेने बोलावे लागेल. वास्तूविषयक व्यवहार करावयाचा असल्यास तो मार्गी लागेल. थोडा धीर धरणे हेच हिताचे ठरेल. मुलांसाठी ठरवलेले नियोजन बदलावे लागेल. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळाल्याने मनाला उत्तम स्फूर्ती मिळेल. आरोग्य उत्तम राहील. >> शुभ दिनांक : २०, २४ >> महिलांसाठी : स्वत:च्या कामातील प्रगती उत्तम साधू शकाल अंदाजे कृती न करता बारकाव्याने काही गोष्टी केल्यास ग्रहांचा कल चांगला ठरेल. सुरुवातीस थोडा उत्साह नरम-गरम असेल. वाकडय़ा वाटेतूनच सरळ मार्ग काढत पुढे जावे लागेल. सहज वाटत नसले तरी अवघडही नाही. बुद्धीकौशल्याच्या चातुर्यावर प्रभावी व उत्तम नेतृत्व पार पाडाल. किचकट गोष्टींचा सामना कमी होत गेल्याने एक उत्साही वातावरण निर्माण होईल. अधिकार प्राप्त होण्याचे मार्ग तुमच्यापुढे उभे राहतील. व्यवसायातील वाढती स्पर्धा लक्षात घेऊन निर्णय घ्या. तुमच्या कार्यात इतरांनी केलेली लुडबुड तुम्हाला चालणार नाही, हेही तितकेच खरे असेल. आर्थिकदृष्टय़ा संकटावर मात कराल. राजकीय क्षेत्रात बदल घडतील. भावंडांच्या बाबतीत गैरसमज वाढवून घेऊ नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा. >> शुभ दिनांक : २२, २३ >> महिलांसाठी : जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. कोणत्याही कामाची सुरुवात उसने अवसान आणून करू नका. प्रत्येक वेळी घाईगडबड करून कृती करणे टाळा. सप्ताहाच्या मध्यार्थात चंद्र अष्टमस्थानात असणार आहे. शनीचे भ्रमणसुद्धा चंद्रावरून होणार आहे. एकाच गोष्टीचा वारंवार पाठपुरावा करणे टाळा. दोलायमान परिस्थितीतून बाहेर या. मानसिक स्वास्थ्य जपा. नोकरीमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. सकारात्मक गोष्टींचा विचार करावा लागेल. दिलेल्या वेळेत कामाची अंमलबजावणी करा. व्यापारी क्षेत्रातील अतिरिक्त गुंतवणूक करूनका. रोखीच्या व्यवहारांना महत्त्व द्या. अनावश्यक खर्च टाळा. सामाजिक क्षेत्रात स्वत:हून हस्तक्षेप करणे टाळा. महत्त्वाच्या बाबी वेळीच लक्षात घ्या. कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. स्वत:च्याही आरोग्य बिघडू देऊ नका. >> शुभ दिनांक : २०, २१ >> महिलांसाठी : किरकोळ संवादातून वाद वाढू देऊ नका. एक घाव दोन तुकडे करण्याचा सध्या तरी विचार करू नका. चंद्राचे भ्रमण षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे होत आहे. शांत व धीराने घेतल्यास कामातील अनुकूलता वाढेल. नोकरीत झालेले बदल पटकन अंगवळणी पडणार नाहीत. जास्त कामाचे नियोजन करावे लागणार आहे. मोठय़ा उद्योगधंद्यात अति धाडस करणे टाळा, हे तुमच्या हिताचे असेल. शेतजमीन, स्थावर मालमत्ता यांचे कागदोपत्री व्यवहार नीट हाताळा. घाईगडबड करून दुसऱ्यावर विसंबून राहू नका. आर्थिकबाबतीत कोणालाही शब्द देऊ नका. मनाला आवर घातल्यास खर्च कमी होतील. सामाजिक क्षेत्रात पाऊल टाकताना सावधानता बाळगा. कुटुंबात होणारे गैरसमज एकत्रित बसून दूर करा. बाहेरील खाण्याचा मोह टाळा व आरोग्य जपा. >> शुभ दिनांक : २२, २३ >> महिलांसाठी : वैवाहिक जीवनात गोड बोलून कार्यभाग साधा. मागील काही दिवस मानसिक कुचंबणेत गेले असले, तरी सध्या ती कुचंबणा कमी होण्याच्या मार्गावर असेल. नोकरीचे वाढते कामकाज करताना कामाचा आराखडा प्रथम ठरवून घ्या. आयत्यावेळी गडबड होणार नाही. काम करते वेळी चिकित्सक राहा. व्यवसायिक अंमल चांगला असेल. छोटय़ा-मोठय़ा कलेला प्राधान्य मिळेल. तुमची कला तुमचे उत्पन्न वाढवणारी आहे. व्यापार संघटनेतील विशिष्ट ठराव मंजूर होतील. तुलनात्मक गोष्टींचा विचारविनिमय करावा लागेल. मिळालेल्या उत्पन्नाचे स्रोत इतरांपुढे ठेवू नका. स्वतचे बजेट पाहून प्रश्न सोडवा. राजकीय क्षेत्रात दोन शब्द कमीच बोला. कौटुंबिक स्तरावर खर्च आटोक्यात ठेवा. आध्यात्मिक राहून मनाची एकाग्रता वाढवा. आहारावर नियंत्रण ठेवा. >> शुभ दिनांक : २१, २४ >> महिलांसाठी : मनोरंजनासाठी पैसा व वेळ यांचा अतिरेक टाळा. धाडस व परिश्रम दोन्हींचा मेळ या सप्ताहात जमणार आहे. नोकरीचा नवीन कल मार्गी लागेल. त्यासाठी ज्येष्ठांची मदत घ्यावी लागेल. नोकरदारांना जुन्या कामाचा अनुभव महत्त्वाचा ठरेल. शासकीय कर्मचाऱ्यांना अपेक्षित परिणाम मिळतील. व्यापार उद्योगधंद्यात स्वतची प्रतिष्ठा पणाला लावण्याची गरज भासणार नाही. टप्प्याटप्प्याने केलेली वाटचाल यशस्वी ठरेल. व्यवसायिक खडतर प्रवास थांबेल. पुन्हा नव्याने सुखकर व्यवसायिक मार्ग चालू होईल. तुमच्या सुप्त गुणांना वाव मिळेल. धनाचा प्रश्न कमी होऊन अपेक्षित प्राप्ती वाढेल. मित्र परिवाराची मदत उत्तम राहील. सार्वजनिक गोष्टीत तुमचा सहभाग उत्तम राहील. कुटुंबातील अवघड वाटणारी जबाबदारी कमी होईल. वैवाहिक जोडीदाराचे लाड पुरवावे लागतील. उपासनेत मन रमेल. आरोग्याची जीवनशैली उत्तम असेल. >> शुभ दिनांक : २१ , २२ >> महिलांसाठी : मनस्ताप करणाऱ्या गोष्टींचा विचार टाळा. ग्रहांचा शुभयोग चांगली फळे देईल. अनेक योजनांतून प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीचा जम बसवणे शक्य होईल. कमी वेळेत कामे पूर्ण करावी लागतील. नवीन संधीचा उपयोग करून घ्या. तुमचे तुमच्या नोकरीवर एक प्रकारचे वर्चस्व राहील. मोठय़ा व्यापारी वर्गाचा प्रगतीकडे कल राहील. स्थिर अवस्था यायला आता वेळ लागणार नाही. त्यामुळे उत्साह वाढेल. धाडसी निर्णय घेऊन व्यवसायात निपुणता मिळवाल. व्यापारी क्षेत्रात परिवर्तन घडून येईल. आर्थिकदृष्टय़ा नियंत्रण मिळवता येईल. बचतीत वाढ होईल. सार्वजनिक क्षेत्रात वेळेला महत्त्व द्या. घरगुती स्वरूपात धार्मिक कार्य करण्याची आवड राहील. जुन्या मित्रमंडळीशी संवाद साधाल. नातेवाईकांना तुमच्या मदतीची अपेक्षा असेल. शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम राहील. >> शुभ दिनांक : २४, २५ >> महिलांसाठी : नियोजनानुसार काम करा. अनामिक भीती कमी होईल. शुभत्व वाढेल व ग्रहांचा परिणाम जाणवेल. नोकरीत एका ठिकाणी स्थिर राहून निर्णय घेता येतील. अनेक बाकी कामांचा आढावा नीट तपासा. जास्त काम करण्याचे तंत्र वाढवावे लागेल. त्यातील वाढते स्वरूप स्थिर ठेवण्याचा प्रयत्न असेल. ठप्प झालेला व्यवसाय पुन्हा प्रगतीपथावर येईल. दिवसेंदिवस व्यापारी क्षेत्र मोठे होईल. चलबिचल अवस्था कमी करा. बऱ्यापैकी आवक वाढेल. धनाचा अडकलेला मार्ग मोकळा होईल. इतरांना दिलेली आश्वासने पूर्ण कराल. एकूणच यशाकडे वाटचाल राहील. सार्वजनिक क्षेत्रात पूर्व परिस्थिती निर्माण होईल. नातेवाईकांशी असणारा गोडवा अजूनही घट्ट होईल. मानसिक मनोधर्य चांगले राहील. धार्मिक अनुष्ठान यशस्वी होईल. आरोग्य ठणठणीत असेल. >> शुभ दिनांक : २१, २२ >> महिलांसाठी : चिकाटीने केलेले प्रयत्न पूर्णत्वाला जातील. उत्तम गती साध्य करण्यासाठी सध्या ग्रहांचा शुभ कल पूरक ठरेल. नोकरीतील परिस्थिती समाधानकारक राहील. त्यामुळे कामात लक्ष केंद्रित होईल. रोजच्या रोज ठरलेले कामाचे परतावे चांगले राहतील. अनेक अडचणींवर मात कराल. ज्येष्ठांची कृपा राहील. उद्योगधंद्यात नावीन्यपूर्ण गोष्टी उदयास येतील. व्यवसायातील संभ्रमित स्थिती बदलेल. नियोजनपूर्वक केलेली उलाढाल यशस्वी ठरेल. भागीदारी व्यवसायात परिपूर्णता येईल. उत्साह वाढल्याने सतत कार्यरत राहाल. हाताबाहेर गेलेल्या गोष्टी आवाक्यात येतील. आर्थिकदृष्टय़ा स्थिरस्थावर व्हाल. राजकीय क्षेत्रात तुमचे मुद्दे स्वतंत्र मांडण्याची संधी मिळेल. जोडीदारासमवेत असलेला अबोला दूर होईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल. प्रकृतीचे स्वास्थ्य उत्तम राहील. >> शुभ दिनांक : २०, २३ >> महिलांसाठी : इतरांची चिंता करणे टाळा. सप्ताहाच्या सुरुवातीला आळस झटकून कामाला लागा. धरसोड वृत्ती बाजूला ठेवा. नोकरीच्या ठिकाणी कामाचे स्वरूप लक्षात घ्या. स्वतचे काम इतरांवर सोपवू नका. स्वतची जबाबदारी स्वत: पार पाडा. त्याचे निश्चित फळ तुम्हाला मिळेल. व्यापारी कल परिपूर्ण तयारीने वाढवा. अचानक कोणताही बदल करू नका. प्रत्येक गोष्टींचे पाऊल हे विचाराने टाका. व्यवहार करताना सतर्क राहणे गरजेचे राहील. त्यामुळे नुकसान होणार नाही. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून घ्या. झालेल्या फायद्याचे खर्चाद्वारे नियोजन करू नका. बचतीत वाढ करा. समाजसेवा करण्याचा मोह निर्माण होईल. घरातील सदस्यांची आवड-निवड जपा. वैवाहिक जोडीदाराशी वादविवाद करणे टाळा. धार्मिक गोष्टीत मन रमेल. नरम-गरम प्रकृती शांत ठेवा. >> शुभ दिनांक : २२ , २४ >> महिलांसाठी : मनाची एकाग्रता वाढवा.

Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार