-
करोनाच्या नव्या प्रकारामुळे देशभरात सावधगिरी बाळगली जात आहे. महाराष्ट्र आणि मुंबईतही खबरदारी घेण्याच्या सूचना सरकारनं आणि मुंबई महापालिकेनं दिल्या आहेत. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाइन करणं सक्तीचं करण्यात आलं आहे. (प्रातिनिधीक छायाचित्रं/इंडियन एक्स्प्रेस)
-
सरकारकडून कडक अंमलबजावणीचे प्रयत्न सुरू असताना मुंबई विमानतळावर बृहन्मुंबई महापालिकेच्या एका इंजिनिअरसह तिघांना अटक करण्यात आली आहे. विदेशातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाइनमधून सूट देण्यासाठी लाच घेताना इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे.
-
बीएमसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार इंजिनिअरला परदेशी नागरिकांकडून पैसे घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. दिनेश गवांडे असं इंजिनिअरचं नाव आहे. त्यांच्यासोबत आणखी दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
-
दिनेश गवांडेकडे क्वारंटाइनमधून सूट देण्यासाठी विदेशी नागरिकांकडून घेण्यात आलेले पैसे, बनावट शिक्का जप्त करण्यात आला आहे. आरोपीनं बनावट शिक्का कसा बनवला, याचा तपास पोलीस करत आहे.
-
प्रातिनिधीक छायाचित्रं/इंडियन एक्स्प्रेस

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा