-
महाविद्यालये सुरू करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केले.
-
या आंदोलनाच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच अभाविपच्या कार्यकर्त्यांनी थेट वर्ग भरवला.
-
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोरच बसून अभविपच्या विद्यार्थ्यांनी एक क्सा घेतला.
-
करोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चपासून सर्व विद्यापीठे व महाविद्यालये बंद करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून दुकाने, मॉल, चित्रपटगृह सुरू करण्यात आली असून फक्त विद्यापीठ व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली असल्याचा आरोप अभाविपाने केलाय.
-
ऑनलाइन शिक्षण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अजूनपर्यंत महाविद्यालये सुरु करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्य दाखवत नाही. यामुळे अभाविप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यायासमोर आंदोलन केले.
-
शैक्षणिक वर्ष संपत आले तरी देखील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे अजून प्रॅक्टिकल सुरु झालेले नाही. ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय चिंतेची बाब आहे. तसेच अनेक विध्यार्थी हे महाविद्यालयांमध्ये होणाऱ्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मिळणाऱ्या नोकरीसाठी प्रयत्नशील असतात तशी तयारी करत असतात जर का महाविद्यालयेच सुरु झाली नाहीत तर कॅम्पस प्लेसमेंट होतील का?, असे प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडलेले आहेत. त्या सर्व विध्यार्थी व पालकांच्या चिंता वाढवण्याचं काम हे सरकार करत आहे राज्य शासनाला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काहीही काळजी नाही, असंही अभविपने म्हटलं आहे.
-
लाखो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचे काम हे शासन करत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.
-
महाविद्यालये सुरु करण्याबाबत शासनाने विचार करून सर्व महाविद्यालये सुरु करावी अशी मागणी अभाविपकडून करण्यात आलीय.
-
बियर बार चालू विद्येचं मंदिर मात्र बंद अशा प्रकारचे पोस्टर्सही आंदोलनात दिसून आले.
-
ना दिशा ना विकास ठाकरे सरकारने शिक्षण क्षेत्र केलं भकास असा टोलाही पोस्टर्समधून अभविपने ठाकरे सरकारला लगावला आहे.
-
शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, म्हणत विद्यालये सुरु करण्याची मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली.

“आशा भोसले या वयात थोडी लाज बाळगा”, मोहम्मद रफींच्या मुलाचं वक्तव्य; लता मंगेशकरांबद्दल म्हणाले, “त्यांना हेवा…”