-
मुंबई, पुणे, नागपूर, यवतमाळ, अमरावतीसह राज्यातील अनेक शहरात करोनाचा उपद्रव होताना दिसत आहे. करोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी काही शहरांत जिल्हा प्रशासनाने विशिष्ट कालावधीसाठी रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली आहे. (छायाचित्र/Express photograph by Ashish Kale)
-
पुण्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनतंर रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. (छायाचित्र/Express photograph by Ashish Kale)
-
पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांना फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. (छायाचित्र/Express photograph by Ashish Kale)
-
आदेश काढल्यानंतर सोमवारपासून निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून, पुण्यातील रस्त्यांवर रात्रीच्या शांतता दिसत आहे. (छायाचित्र/Express photograph by Ashish Kale)
-
शहरातील लक्ष्मी रोड आणि एमजी रोडवर नाईट कर्फ्यूच्या काळात शुकशुकाट होता. (छायाचित्र/Express photograph by Ashish Kale)
-
नाईट कर्फ्यूची वेळ सुरू झाल्यानंतरही सुरू असलेल्या दुकानांना पोलिसांनी भेट दिल्या. दुकानदारांना दुकानं बंद करायला लावली. (छायाचित्र/Express photograph by Ashish Kale)
-
पुण्याबरोबरच अमरावतीतील परिस्थितीही चिंताजनक आहे. शहरासह जिल्ह्यात करोना बळावला असून, अचानक रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. (छायाचित्र/ANI)
-
रुग्णसंख्येच्या वाढीबरोबरच करोनाचं संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी अमरावतीमध्येही १ मार्चपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अमरावतीत रस्त्यांवरही शांतता दिसत आहेत. (छायाचित्र/ANI)
-
अमरावती शहरात सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. (छायाचित्र/ANI)
-
नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलेला असला, तरी या काळात सकाळी आठ ते दुपारी ३ वाजेपर्यंत फक्त जीवनावश्यक वस्तुंची दुकानं सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. (छायाचित्र/ANI)

अमिताभ बच्चन यांना ४.५ कोटींची रोल्स रॉयस भेट दिल्याने दिग्दर्शकाला आईने कानाखाली मारलेली, म्हणाला…