-
करोना विषाणूनं पुन्हा एकदा मगरमिठी आवळली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. (Express photo by Pavan Khengre)
-
करोना रुग्णसंख्येचा स्फोट झाल्यासारखी परिस्थिती असून, आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. (Express photo by Ashish Kale)
-
विविध ठिकाणी रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. (Express photo by Ashish Kale)
-
महत्त्वाचं म्हणजे करोना रुग्णांसाठी संजीवनीप्रमाणे असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. (Express photo by Ashish Kale)
-
पुण्यातील हे दृश्य असून, रेमडेसिवीरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धडपड सुरू आहे. (Express photo by Ashish Kale)
-
रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. पुण्यातील परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव ही दृश्य करून देत आहेत. (Express photo by Ashish Kale)
-
पुण्यात रेमडेसिवीरसाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. (Express photo by Ashish Kale)
-
अनेक ठिकाणी नातेवाईकांचा संताप होतानाही दिसत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही करण्यात आला आहे. (Express photo by Pavan Khengre)
-
पुण्यातील विविध मेडिकलसमोर अशी गर्दी दिसत आहे. (Express photo by Pavan Khengre)
-
रेमडेसिवीर मिळवण्यासाठी नागरिकांना सध्या रांगेत तास न् तास ताटकळत बसावे लागत आहे. (Express photo by Pavan Khengre)

पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळं खा