-
कसर भरून निघेल : गुरू चंद्र शुभयोग फलदायी ठरेल. सप्ताहात चंद्रग्रहाचे पाठबळ उत्तम राहील. व्यावसायिक चालढकलपणा मार्गस्थ होण्याच्या वाटेवर असेल. निर्णयाची अंमलबजावणी घाईने करू नका. सुधारित योजनांचा पाठपुरावा करून ध्येयापर्यंत निश्चित पोहोचाल. लघुलेखन, वृत्तपत्र संपादक, पत्रकार, बातमी इत्यादी क्षेत्रांतील व्यक्तींना आपले मुद्दे योग्य पद्धतीने मांडावे लागतील. नोकरदारांना प्रत्येक गोष्ट नियमात राहून करावी लागेल. आवाक्याबाहेरच्या गोष्टींना थारा देऊ नका. आर्थिकदृष्टय़ा कसर भरून निघेल. सामाजिक क्षेत्रात स्वकर्तृत्वाला वाव मिळेल. नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना सहानुभूती द्याल. जवळीकता साधणे शक्य नसले तरी संपर्कात राहाल. मुलांच्यासाठी काढलेला वेळ सत्कारणी लागेल. आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल. द्विधा अवस्था कमी होईल. शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्ती उत्तम राहील. शुभ दिनांक : २१, २२ महिलांसाठी : मिळालेल्या वेळेचा उपयोग योग्य कारणासाठी करा. (स्मिता अतुल गायकवाड)
-
नियोजन यशस्वी होईल : अवघड वाटणाऱ्या गोष्टी सहजसोप्या होऊ लागतील. नवीन व्यवसाय केव्हा कसा करायचा, याला थोडा वेळ द्यावा लागेल. भागीदारी व्यवसायात अचानक झालेले बदल स्वीकारावे लागतील. त्यावर विचार न करता अंमलबजावणी करणे योग्य राहील. वेळेचा सदुपयोग करून घ्या. कामाच्या बाबतीत ज्या गोष्टी अडचणीच्या वाटत होत्या त्या व्यवस्थित मार्गी लागण्याची चिन्हे दिसतील. नोकरदार व्यक्तींनी कामात गाफील राहू नका. ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शन सल्ल्याने प्राधान्यक्रम ठरवा. त्यामुळे अनेक गोष्टींचा तर्कवितर्क करणे सोपे जाईल. आर्थिकदृष्टय़ा नियोजन यशस्वी होईल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा होईल. कुटुंबासमवेत गप्पा गोष्टींमध्ये मन रमेल. उपासना फलद्रूप होतील. मानसिक-शारीरिक त्रास कमी होईल. शुभ दिनांक : १८, २४ महिलांसाठी : होणारे बदल स्वीकारून पुढे चला.
-
संधी मिळेल : ऊन-सावलीप्रमाणे ग्रहांचा हा पाठशिवणीचा खेळ मनावरील मळभ दूर करणारे असेल. व्यवसायात शिथिलता असली तरीसुद्धा धीर धरून कार्य कराल. फार मोठा नफा वाढवणारा नसला तरी तोटाही नाही. वास्तवतेला धरून निर्णय घेण्याची क्षमता उत्तम असेल. उत्पादनकार्य संथ गतीने चालू राहील. नोकरदारवर्गाने मनामध्ये असलेली भीती बाजूला ठेवा. गरजेपुरता विचार करून विनाकारण होणारी धावपळ कमी करा. आर्थिकबाबतीत समाधानकारक परिस्थिती राहील. राजकीय क्षेत्रात नवीन योजना राबवण्यासाठी संधी मिळेल. प्रत्येक गोष्टीसाठी कुटुंबाची साथ मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंदी व उत्साही राहील. आध्यात्मिक ओढा राहील. मानसिक ताण कमी होईल. आरोग्याबाबतीत काळजीचे कारण राहणार नाही. शुभ दिनांक : २०, २१ महिलांसाठी : मनामध्ये असणारे भीतीचे वातावरण कमी करा.
-
युक्तिवाद कामी येईल : सप्ताहाची सुरुवात आळसदायक करू नका. वेळेचा उपयोग करून कामाचे नियोजन करा. तुमच्या राशीतून होणारे चंद्रग्रहाचे भ्रमण चंचलता वाढवणारे ठरेल. व्यावसायिक गोष्टींचा सारासार विचार करा, पुढील दृष्टीने फायद्याचे राहील. व्यवसायात काही वस्तूंचा तुटवडा होणार नाही याची दक्षता घ्या. तुमचे वेळापत्रक ठरवून ठेवा. नोकरदारवर्गाला गैरसोयीचे वातावरण धाकधूक वाढविणारे असले तरी निवारण मार्ग निघेल. अधिकारी व्यक्तींशी होणाऱ्या चच्रेतून तुमचा युक्तिवाद कामी येईल. खर्चाची तरतूद योग्य प्रकारे केल्यास आर्थिक अडचणी येणार नाहीत. राजकीय क्षेत्रातील मतभेद दूर ठेवा. महत्त्वाच्या बाबी लक्षात घेऊन पुढील गोष्टींसाठी सतर्क राहा. कुटुंबात मोकळेपणाने संवाद केल्याने मन हलके होईल. भावंडांशी जवळीक वाढेल. आरोग्याचा प्रश्न तणावमुक्त करणारा असेल. शुभ दिनांक : २०, २२ महिलांसाठी : कुटुंबाला तुमच्याबद्दल हेवा वाटेल.
-
अस्थिरता कमी होईल : चंद्राचे लाभस्थानातून होणारे भ्रमण अडचणीवर मात करणारे ठरेल. कामकाजात सूर लागेल. त्यासाठी होणारी घालमेल कमी होईल. आजचे काम आज करून उद्याचे नियोजनही आजच कराल. व्यवसायात येणाऱ्या तांत्रिक अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसू लागतील. नोकरदारवर्गाला ठरवलेले नियोजन बदलावे लागेल. अपुरे कामकाज पूर्ण करण्याची जबाबदारी वाढेल. बौद्धिक क्षेत्रात नवीन तंत्र हाती येईल. मिळालेल्या फायद्याचे बचतीत रूपांतर केल्यास विनाकारणाचा खर्च टळेल. सामाजिक कार्यात मोलाचा सहभाग असेल. मदतीच्या भावनेने केलेल्या कामकाजाचा आनंद मिळेल. कौटुंबिक स्तरावर तुमची भूमिका योग्य असेल. धार्मिक गोष्टीतील उत्सुकता वाढेल. मानसिक मनोधर्य उत्तम राहील. आरोग्याच्या बाबतीत असलेली अस्थिरता कमी होईल. शुभ दिनांक : २३,२४ महिलांसाठी : विश्वसनीय व्यक्ती म्हणून तुमच्याकडे पाहिले जाईल.
-
योग्य समन्वय साधा : सप्ताहाच्या सुरुवातीला कामाचा आलेख चांगला राहील. व्यावसायिक स्तरावर चाललेली चलबिचलता कमी करा. सुरुवात हळूहळू का होईना चांगली राहील. प्रगतीचा मार्ग स्वीकारून पुढे जाणे योग्य असेल. नोकरदारवर्गाला मनाला हुरहुर लावणाऱ्या गोष्टींचा त्रास कमी होईल. तुमचा चिवटपणा स्थिर राहण्यास मदत करेल. अनेक गोष्टीचा तर्कवितर्क करणे सोपे जाईल. वरिष्ठांचे वर्चस्व चांगले राहील. धनाचे मार्ग मोकळे होतील. पण योग्य ती बचत करणे इष्ट ठरेल. सामाजिक स्तरावर योग्य समन्वय साधा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या बोलण्यातून वेगळा अर्थ घेऊ नका. चांगल्या गोष्टींचा ध्यास धरा. मुलांचे पाऊल चुकीच्या ठिकाणी पडले जाणार नाही याची दक्षता घ्या. दुखणे अंगावर न काढता आरोग्याची काळजी घ्या. शुभ दिनांक : २०, २१ महिलांसाठी : अफवांवर विश्वास ठेवू नका.
-
आवक उत्तम राहील : भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होणारे चंद्राचे भ्रमण अनुकूल परिणाम देणारे ठरेल. उद्योग-व्यवसायात वाढत असलेल्या अडचणींवर मात कराल. स्वतंत्र व्यवसायात इतरांवर जबाबदारी टाकणे इष्ट ठरणार नाही. स्वत: कामाची तरतूद करावी लागेल. प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे फळ मिळेल. नोकरदार व्यक्तींनी कोणतेही निर्णय घेताना ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे हिताचे ठरेल. स्वत:चे ध्येय साध्य करण्यासाठी शांतपणाने पाऊल उचलावे लागेल. आवक उत्तम राहील. सामाजिक क्षेत्रात कार्यमग्न राहाल. मित्रपरिवाराची मदत सत्कारणी लागेल. घरातील सदस्यांना विश्वासात घेऊन नियोजित कामाची कल्पना द्या. मुलांच्यासाठी ठरवलेले नियोजन निश्चित पार पाडाल. आध्यात्मिक गोष्टीतील उत्साह वाढेल. मानसिक परिवर्तन घडेल. शारीरिकदृष्टय़ा प्रकृती उत्तम असेल. शुभ दिनांक : २२, २३ महिलांसाठी : मनोरंजनात्मक गोष्टींमध्ये वेळ जाईल..
-
आत्मविश्वास वाढेल : सप्ताहातील चंद्र ग्रहाचे पाठबळ मनाचा उत्साह वाढवणारे आहे. सध्या व्यावसायिकदृष्टय़ा नियोजन ठरवणार आहात, त्यात बदल घडणे शक्य आहे. होणाऱ्या बदलाचा स्वीकार करून पुढील बाबींचा आढावा घेणे योग्य असेल. कोणत्याही गोष्टीची खात्री झाल्याशिवाय वार्ता करणे टाळा. होकारार्थी विचारांना दुजोरा द्या. प्रथमत: प्राथमिक गरजांना प्राधान्य द्या. नोकरदार व्यक्तींचा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा नव्याने वाढेल. नवीन संकल्पना मोठय़ा कार्यक्षमतेने पार पाडाल. आर्थिक चणचण भासणार नाही. राजकीय क्षेत्रात चौफेर विचार महत्त्वाचा राहील. मत्री या नात्यावरील विश्वास दृढ होईल. मुलांच्या पुढील भवितव्यासाठी आखलेल्या नियोजनाचा फायदा होईल. कौटुंबिक वातावरणात एकमत राहील याकडे लक्ष द्या. प्रकृती स्वास्थ्य चांगले राहील. शुभ दिनांक : २०, २१ महिलांसाठी : परिस्थितीनुसार बदल घडवा.
-
अचूक निर्णय घ्या : सतत दडपण घेत राहणे, त्याच त्याच गोष्टीला दुजोरा देणे टाळणे चांगले. घाईने कोणतीही कृती साध्य होणार नाही हे लक्षात घ्या. वृत्तपत्र व संपादक, पत्रकार यांना अनेक गोष्टींचा आढावा घ्यावा लागेल. प्रयत्नांची परिसीमा गाठावी लागत असताना प्रयत्न यशस्वी करून दाखवाल. वरिष्ठांचा असलेला प्रतिसाद तुमच्या कार्याची दाद देणारा ठरेल. या संधीचा उपयोग करून कामातील उणीव भरून काढाल. शासकीय कर्मचारी वर्गाला मानसिक कणखरपणा वाढवावा लागेल. नियोजित वेळ बघून वाटचाल करावी लागेल. धर्याने सामोरे जाऊन अचूक निर्णय घ्या. खर्चाची मर्यादा ओलांडू नका. सामाजिक क्षेत्रात तुमच्या बोलण्यातून इतरांचा आत्मविश्वास वाढेल असा प्रयत्न करा. शारीरिक व मानसिक आरोग्य सांभाळा. शुभ दिनांक : २२, २३ महिलांसाठी : आवडीच्या कामामध्ये मन रमवा.
-
शांत राहणे उत्तम : चंद्राचे भ्रमण षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे होत आहे. असे असताना सुरुवात जोराची नसली तरी वाईट नाही. प्रयत्नांवर विश्वास ठेवून कार्य करा. विचारांचे काहूर बाजूला ठेवा. कोणत्याही गोष्टीसाठी मिळतेजुळते घेणे हिताचे राहील. उद्योगधंद्यातील आवक-जावक बेताची असली तरी तोटय़ाची होणार नाही याची दक्षता घ्या. नोकरदार वर्गाला अपुऱ्या कामकाजाला गती द्यावी लागेल. कामामध्ये राहिलेल्या त्रुटी भरून काढा. तडजोडीतूनच मार्ग निघेल हे विसरू नका. आर्थिकदृष्टय़ा उधारीचे व्यवहार करू नका. बचतीत वाढ करण्याचा प्रयत्न करा. राजकीय क्षेत्रात इतरांवर जबाबदारी सोपवून चालणार नाही. स्वत: गतिशील राहावे लागेल. कुटुंबात चाललेल्या चच्रेवर प्रतिउत्तर न करता शांत राहणे उत्तम ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने निष्काळजीपणा टाळा. शुभ दिनांक : २१, २२ महिलांसाठी : होऊन गेलेल्या घटनांवर विचार करणे टाळा.
-
विश्वास जपा : सप्ताहात राहणारे चढ-उतार वेळीच लक्षात घ्या. नकळत घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्नशील राहा. व्यावसायिकदृष्टय़ा जेमतेम स्थिती निर्माण होईल. कामकाजाचा सूर सुरळीत लागण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. वनस्पतिजन्य व्यवसायामध्ये एकदम माल साठवून ठेवणे योग्य ठरणार नाही. आवश्यकतेनुसार उत्पादन वाढवा. नोकरदार वर्गाने कामावर होणारा परिणाम लक्षात घ्या. बेजबाबदारपणे राहू नका. कामाचा ओघ शिथिल असेल. नियमांच्या चौकटीत राहून कामाचा आराखडा तयार करा. आर्थिक बाबतीत इतरांना शब्द देणे योग्य ठरणार नाही. रोखीच्या व्यवहाराला महत्त्व द्या. सामाजिक क्षेत्रात रचनात्मक बदल घडतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा विश्वास जपा. आरोग्याचे पथ्यपाणी सांभाळा. शुभ दिनांक : २२, २३ महिलांसाठी : मनाची लवचीकता वाढवा.
-
चौफेर विचार महत्त्वाचा : विविध क्षेत्रांत पदार्पण करताना अति धाडस वाढवणे योग्य ठरणार नाही. शिस्त व नियम दोन्हींची सांगड उत्तम घालण्याचा प्रयत्न करा. व्यवसायवाढीसाठी चौफेर विचार महत्त्वाचा राहील. काही महत्त्वाच्या बाबींवर विचारविनिमय करताना अनावश्यक मुद्दे टाळा. नोकरदार वर्गाने कोणत्याही भूलथापांना बळी न पडता कामाकडे लक्ष केंद्रित करा. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला शिरोधार्य मानावा लागेल. कामकाजाचे आयोजन करताना जबाबदारी वाढेल. आर्थिक बाबतीत अंदाजे खर्च करणे टाळा. सामाजिक माध्यमांचा चांगल्या कारणासाठी वापर करा. मुलांच्या बाबतीत खोलवर विचार करून घेतलेला निर्णय योग्य असेल. कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. शारीरिकदृष्टय़ा योगसाधनेला महत्त्व द्या. शुभ दिनांक : २०, २१ महिलांसाठी : अनावश्यक गोष्टी टाळा.

Operation Sindoor: भारतीय हवाई दलाचा पाकिस्तानला जबरदस्त दणका; ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाडली पाकिस्तानी लष्कराची ६ विमाने