-
करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. (छायाचित्र> सागर कासार_लोकसत्ता)
-
शहरासह जिल्ह्यात दिवसाला जवळपास १० हजारांच्या आसपास रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताण वाढला आहे. (छायाचित्र> सागर कासार_लोकसत्ता)
-
पुण्यातील करोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी आधी मिनी लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यानंतर आता संचारबंदी आणि वीकेंड लॉकडाउन लागू केलेला आहे. मात्र, तरीही रुग्णसंख्या वाढतच आहे. (छायाचित्र> सागर कासार_लोकसत्ता)
-
पुण्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून, शिवसेनेचे विभागप्रमुख सुरज लोखंडे यांनी करोना रुग्णांना सुविधा पुरवण्याच्या मागणीसाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारसमोर आंदोलन केलं. (छायाचित्र> सागर कासार_लोकसत्ता)
-
"काम करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला नावं ठेवणाऱ्यानो आता जागे व्हा! पुण्यनगरीचे खासदार गिरीशजी बापट, कोल्हा-पुरातून आयात केलेले आमदार चंद्रकांत पाटील आणि पुणे महानगरपालिकेत सत्ता असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने आता तरी जागे व्हा! जनतेला ऑक्सिजनचे बेड मिळेना ते उपलब्ध करून द्या आणि पुणेकर नागरिकांची जबाबदारी घ्या", असा फलक लोखंडे यांनी आंदोलनस्थळी लावला होता. (छायाचित्र> सागर कासार_लोकसत्ता)

CJI B.R Gavai: भटक्या कुत्र्यांविरोधातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देशभरातून नाराजी; सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणाले, “मी…”