-
तेलंगणातील पोचमपल्ली गावाची मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने (UNWTO) सर्वोत्तम पर्यटन गावांपैकी एक म्हणून निवड केली आहे. (फोटो – एएनआय)
-
स्पेनमधील माद्रिद येथे २ डिसेंबर २०२१ रोजी हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जाईल.
-
केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री जी किशन रेड्डी यांनी गावातील लोकांचे अभिनंदन केले आहे -
ते म्हणाले, “पोचमपल्लीच्या अनोख्या विणकामाच्या शैली आणि नमुन्यांवर पंतप्रधान मोदी यांच्या ‘वोकल फॉर लोकल’ या मंत्राद्वारे आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून विशेष लक्ष केंद्रित केले गेले.
-
“विशेषत: पोचमपल्लीच्या लोकांच्या आणि तेलंगणातील लोकांच्या वतीने, पोचमपल्ली गावाला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे.
-
पोचमपल्ली आणि इतर गावांची नावं प्रभावीपणे मांडल्याबद्दल मी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचाही आभारी आहे,” असंही रेड्डी म्हणाले.
-
UNWTO च्या उपक्रमाद्वारे ‘सर्वोत्कृष्ट पर्यटन गावां’चा उद्देश ग्रामीण स्थळांची उत्कृष्ट उदाहरणे असलेल्या गावांना पुरस्कार देणे हा आहे.
-
प्रशिक्षण आणि सुधारणांच्या संधींद्वारे त्यांच्या ग्रामीण पर्यटन क्षमता वाढवण्यासाठी गावांना पाठिंबा देण्याचे देखील हे देखील यामागचं उद्दिष्ट आहे.
-
पर्यटन मंत्रालयाने भारतातील UNWTO सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम प्रवेशासाठी तीन गावांची शिफारस केली होती.
-
त्यामध्ये मेघालयातील कोंगथोंग, मध्य प्रदेशातील लाधपुरा खास आणि तेलंगणातील पोचमपल्ली या गावांचा समावेश होता.
-
त्यापैकी पोचमपल्ली गावाला हा पुरस्कार देण्यात आला आहे.
-
पोचमपल्ली हे गाव हैदराबादपासून ५० किमी अंतरावर असून तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात आहे.
-
पोचमपल्ली हे गाव इक्कतच्या सिल्क साड्यांसाठी प्रसिद्ध आहे.
-
या गावाला ‘भारताची सिल्क सिटी’ म्हणून संबोधले जाते.
-
पोचमपल्ली इक्कतला २००२ मध्ये सरकारकडून भौगोलिक निर्देशक (GI) मानांकन देखील प्राप्त झाले आहे.

Vaishnavi Hagawane Death Case : “तुला मुलगा होत नाही तर…”, सासरे-दिराकडून मयुरी जगतापला अश्लील शिवीगाळ? अंजली दमानियांकडून ‘ते’ पत्र शेअर