-
उत्तर प्रदेश पासून ते महाराष्ट्र-हरियाणापर्यंत काही जण केवळ २४ तास मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर राहिलेत. तर काही जण तीन ते नऊ दिवस खुर्चीवर राहू शकले. चला तर मग जाणून घेऊया देशातील कोणत्या राज्यांमध्ये आतापर्यंत सर्वात कमी काळाचे मुख्यमंत्री झाले आहेत.
-
महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांबद्दल बोलायचे झाले तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हे केवळ तीन दिवस मुख्यमंत्री होते. ३ दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन देवेंद्र हे देशातील तिसरे नेते बनले ज्यांचा कार्यकाळ केवळ तीन दिवसांचा होता.
-
अवघ्या ३ दिवसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात कर्नाटकचे बीएस येडियुरप्पा यांचेही नाव आहे. २०१८ मध्ये कर्नाटकातील राजकीय घडामोडींचे केंद्रबिंदू असलेले भाजपा नेते आणि प्रदेशाध्यक्ष बीएस येडियुरप्पा यांचे सरकार अवघ्या तीन दिवसांत कोसळले. २००७ मध्ये देखील बीएस येडियुरप्पा केवळ ८ दिवस मुख्यमंत्री होते.
-
मेघालयमध्ये देखील सर्वात कमी काळासाठी मुख्यमंत्री झाले आहेत. एससी मारक हे केवळ तीन दिवसांसाठी मुख्यमंत्री राहिले होते. १९९८ मध्ये मेघालयात काँग्रेस नेते सालसेंग सी मारक यांचे सरकार अवघ्या ३ दिवसांत कोसळले होते.
-
युपीमध्येही अवघ्या २४ तासांचे मुख्यमंत्री झाले होते. १९९८ मध्ये काँग्रेस नेते जगदंबिका पाल मुख्यमंत्री झाले होते. मात्र त्यांना पाठिंबा देणाऱ्या १२ आमदारांना अपात्र ठरवल्यामुळे जगदंबिका यांचे मुख्यमंत्रीपद गेले होते.
-
हरियाणातील दिग्गज नेत्यांपैकी एक असलेले ओमप्रकाश चौटाला हे केवळ ४ दिवस मुख्यमंत्री राहिले होते. १९९१ मध्ये ते फक्त चार दिवस आणि १९९० मध्ये ते फक्त ५ दिवस मुख्यमंत्री झाले.
-
उत्तराखंडचे मुख्यमंत्री असलेले हरीश रावतही एका दिवसाचे मुख्यमंत्री झाले. १८ मार्च २०१६ रोजी काँग्रेसच्या ९ आमदारांनी बंड केल्यानंतर काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले, त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली, मात्र उच्च न्यायालयाने २१ एप्रिल रोजी राष्ट्रपती राजवट हटवली आणि हरीश रावत पुन्हा मुख्यमंत्री झाले. पण दुसऱ्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने नैनिताल उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य नसल्याचे सांगत राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि हरीश रावत एक दिवसाचे मुख्यमंत्री झाले होते.
-
बिहारचे सतीश प्रसाद सिंह १९६८ मध्ये केवळ ५ दिवसांसाठी मुख्यमंत्री झाले होते.
-
झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष असलेले शिबू सोरेन यांचे सरकारही एकदा केवळ ९ दिवसांत पडले होते. ते केवळ ९ दिवसांचे मुख्यमंत्री झाले. (सर्व फोटोः सोशल मीडिया)
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…