-
आज २६ नोव्हेंबर…आजचा दिवस देशाच्या इतिहासातला एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. संविधान दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेचा खर्डा किंवा मसुदा, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीकडून स्वीकारला गेला. या घटना समितीने १६६ दिवस काम केले. राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने व अठरा दिवस एवढा कालावधी लागला.
-
पण तुम्हाला माहित आहे का, घटनाकारांनी जगातल्या सुमारे ६० देशांच्या संविधानांचा अभ्यास करुन त्यातल्या चांगल्या बाबींचा समावेश भारतीय संविधानात केला आहे. जाणून घ्या, जगातल्या प्रमुख संविधानांवरुन भारतीय संविधानात स्वीकारण्यात आलेल्या तत्वांबद्दल…
-
ब्रिटनचे संविधान – संसदीय शासन प्रणाली, कायद्याचे राज्य, कायदेनिर्मिती, एकेरी नागरिकत्व, कॅबिनेटपद्धती, द्विगृही कायदेमंडळ
-
अमेरिकेचे संविधान – सरनामा, मूलभूत हक्क, न्यायिक पुनर्विलोकन, न्यायमंडळाचे स्वातंत्र्य, महाभियोग, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची पदच्युती, उपराष्ट्रपती
-
फ्रान्सचे संविधान – सरनाम्यातील गणराज्य; स्वातंत्र्य, समता, बंधुता हे शब्द.
-
कॅनडाचे संविधान – प्रबळ केंद्रशासन असलेले संघराज्य, शेषाधिकार संसदेकडे, राज्यपालांची निवड राष्ट्रपती करतात, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादायी अधिकार क्षेत्र
-
आयर्लंडचे संविधान – राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतींची निवडणूक, राज्यसभेवर सदस्यांचे नामनिर्देशन
-
जर्मनीचे वायमर संविधान – आणिबाणी काळात मूलभूत हक्कांचे निलंबन
-
ऑस्ट्रेलियाचे संविधान – समवर्ती सूची, व्यापार-वाणिज्य स्वातंत्र्य, संसदेच्या दोन्ही गृहांची संयुक्त बैठक
-
जपानचे संविधान – कायद्याने प्रस्तावित कार्यपद्धती
सोव्हिएत रशियाचे संविधान – मूलभूत कर्तव्ये, सरनाम्यातील सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय -
दक्षिण आफ्रिकेचे संविधान – संविधान दुरुस्तीची पद्धत, राज्यसभा सदस्यांची निवडणूक
पुढील वर्षी असं काही होईल…जे कधीच झालं नाही; २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? बाबा वेंगाचं भाकित जाणून धक्का बसेल