-
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आज ७५वा वाढदिवस.
-
त्यांचा जन्म ९ डिसेंबर १९४६मध्ये इटलीतल्या लुसियाना व्हिसेंजा इथं एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला.
-
ब्रिटनमध्ये शिक्षण घेत असताना त्यांची राजीव गांधींशी ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि नंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
-
भारताच्या पंतप्रधानांचा मुलगा असलेल्या राजीवशी सोनियांनी १९६८ मध्ये लग्न केलं आणि त्या गांधी घराण्याच्या सून झाल्या.
-
इंदिरा गांधींच्या मृत्यूपर्यंत राजीव गांधी हे राजकारणात नव्हते. इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीत काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान होण्यासाठी राजीव गांधींना गळ घातली आणि अगदी तरुण वयात राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले.
-
सोनिया गांधींना राजीव, प्रियांका आणि राहुल गांधींच्या सुरक्षेची काळजी वाटत होती. त्यामुळे त्यांनी राजीव यांनी पंतप्रधान होऊ नये असं वाटत होतं. मात्र, राजीव पंतप्रधान झाले.
-
२१ मे १९९१ रोजी प्रचारसभेत राजीव गांधी यांची आत्मघातकी मानवी बॉम्बने हत्या केली.
-
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या आणि काँग्रेस सत्तेवर आल्यावर त्या पंतप्रधानपदाच्या पहिल्या दावेदार होत्या.
-
मात्र, सोनिया गांधी इटलीच्या आहेत आणि याच कारणावरून एक विदेशी महिला पंतप्रधान होणार, हे कळल्यावर विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला आणि सोनिया स्वतः पंतप्रधान न होता मनमोहन सिंग यांना पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसवले होते.
-
तेव्हा राहुल गांधी वयाने तरुण होते आणि राजकारणापासून खूप दूर होते, त्यामुळे त्यांच्या नावाचा विचारही केला जात नव्हता.
-
पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सोनियांनी पंतप्रधानपदाची खुर्ची विरोधकांमुळे नाही तर राहुल गांधींमुळे सोडली. यासंदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नटवर सिंग यांनी त्यांच्या ‘वन लाइफ इज नॉट इनफ’ या पुस्तकात खुलासा केला आहे.
-
राहुल गांधी नेमकं सोनियांना काय म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान बनण्याचा आपला इरादा बदलला? चला जाणून घेऊया.
-
अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला बहुमत न मिळाल्याने यूपीएचा जन्म झाला आणि आता सोनिया गांधी ७ रेसकोर्सवर जातील, असे निश्चित झाले होते. मात्र, हे घडले नाही.
-
यावर नटवर सिंह लिहितात, राहुल गांधी त्यांची आई सोनिया यांच्या पंतप्रधान होण्याच्या विरोधात होते. त्यांनी त्याला त्यांनी कडाडून विरोध केला.
-
आजी आणि वडिलांच्या बाबतीत जे घडले, तेच पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या आईसोबत घडले तर आपण आपली आई गमावू, अशी भीती राहुल यांना होती. दरम्यान, आपल्या आईला पंतप्रधान होऊ न देण्यासाठी आपण कोणतेही पाऊल उचलण्यास तयार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले होते.
-
नटवर सिंह लिहितात, ‘राहुल गांधी हे प्रबळ इच्छाशक्ती असेलेले व्यक्ती आहेत. त्यांनी सोनिया गांधींना दिलेली धमकी छोटी नव्हती. त्यांनी सोनिया गांधींना विचार करण्यासाठी २४ तास दिले होते. त्यावेळी मी, मनमोहन सिंग आणि प्रियांका गांधी उपस्थित होतो.
-
राहुल यांच्या धमकीनंतर सोनिया गांधी खूप अस्वस्थ झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आई म्हणून राहुलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणं त्यांना अशक्य होतं. याच कारणामुळे सोनिया गांधींनी पंतप्रधान होण्याचा इरादा सोडला होता.
-
नटवर सिंग लिहितात की, सोनिया गांधींच्या या निर्णयाची फक्त त्यांना आणि मनमोहन सिंग यांना माहिती होती.
-
यानंतर सोनिया गांधींनी बैठक बोलावली आणि त्यात आपण मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदाची ऑफर देत असल्याचे जाहीर केले.
-
नटवर सिंग लिहितात, की त्यांनी एकदा सोनिया गांधींना याबद्दल म्हटलं होतं की, इतिहासात फक्त दोन लोकांनी सत्ता नाकारली आहे आणि योगायोगाने दोघेही इटालियन होते. दुसरा कोण होता? यावर सोनियांनी उत्तर देत म्हटलं होतं – ज्युलियस सीझर. (सर्व फोटो – द इंडियन एक्सप्रेस)
Zohran Mamdani: न्यूयॉर्कला मिळाला भारतीय वंशाचा महापौर; डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रखर विरोध करूनही जोहरान ममदानी विजयी