-
जम्मू-काश्मीरमधील अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे.
-
बर्फवृष्टीमुळे राज्यातील तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली आहे.
-
मोठ्या प्रमाणावर झालेल्या या बर्फवृष्टीमुळे रस्त्यांवर, झाडांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची जणू मखमली चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे.
-
काश्मीरचं हे सौंदर्य पर्यटकांना पर्यटनासाठी खुणावू लागलंय.
-
सगळीकडे बर्फाची चादर पसरली आहे.
-
रस्त्यांवरही बर्फ दिसतोय.
-
काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाल्याने वाहतुकीला अडचणी येत आहेत.
-
तर, बर्फाळ चादर पसरल्याने इथला परिसर खूप सुंदर दिसत आहे.
-
रस्ते, बागबगिचे, उद्यानं डोळ्यांचे पारणे फेडत आहेत.
-
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर संततधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
-
दरम्यान, कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिरात हेलिकॉप्टर सेवा प्रभावित झाली आहे.
-
(फोटो सौजन्य – बिजल )

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल