-
काश्मिरी पंडितांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज (सोमवार) पुण्यात शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. (सर्व फोटो -सागर कासार)
-
शहरातील गुडलक चौकात मोठ्या संख्येने शिवसैनिक आंदोलनासाठी जमले होते.
-
आंदोलनावेळी शिवसेना कार्यकर्त्यांचा पोलिसांसोबत वाद झाला.
-
पण संबधीत कार्यकर्त्यांना वरिष्ठ पोलिसांनी समज देताच हा वाद थांबला.
-
आंदोलक शिवसेना कार्यकर्ते आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे दिसून आले.
-
यावेळी आंदोलक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
-
काश्मिरी पंडितांना संरक्षण देण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले आहे असा आरोप यावेळी शिवसेनेकडून करण्यात आला.
-
तसेच, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी देखील यावेळी शिवसैनिकांकडून करण्यात आली.
-
केंद्रातील सत्तेला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपाकडून विविध ठिकाणी कार्यक्रम घेतले जात आहेत. पण त्याच दरम्यान जम्मू काश्मीर येथील पंडितांवर पुन्हा एकदा हल्ले सुरू झाले आहेत. असं शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले.
-
काश्मीर आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, देशात नेते सतराशे साठ हिंदूंचा एकच हिंदुहृदयसम्राट असे काही फलक शिवसैनिकांनी झळकवले.
-
मेहबुबा सोबत भाजपा लाचार काश्मीर फाईलचा केला प्रचार आता काश्मिरच्या परिस्थिताला कोण जबाबदार? असा सवाल करत शिवसैनिकांनी भाजापवर टीका केली.
‘या’ ४ भाग्यवान राशी ६० दिवसांत श्रीमंत, करोडपती होण्यासाठी दिवस मोजायला सुरूवात… काय सांगते बाबा वेंगा यांची भविष्यवाणी