-
जम्मू-काश्मीरच्या प्रसिद्ध अशा अमरनाथ यात्रेला गुरुवारी ३० जूनपासून सुरूवात होणार आहे. (PTI Photo)
-
मंगळवारी दि. १४ जून ज्येष्ठ पौर्णिमा रोजी अमरनाथ यात्रेची प्रथम पूजा पार पडली. (PTI Photo)
-
हिमालयातील उंच भगवान शिवाच्या गुहेपर्यंतची वार्षिक अमरनाथ यात्रा ही देशातील सर्वात प्रतिष्ठित तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. (PTI Photo)
-
जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपाल कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, परंपरेनुसार ही यात्रा रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत म्हणजेच ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. (PTI Photo)
-
या वर्षी अमरनाथ यात्रा ४३ दिवस चालणार आहे. (PTI Photo)
-
या वेळी रामबन आणि चंदनवाडीत शिबिरे मोठी असतील. (PTI Photo)
-
या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. (Jaipal Singh/ Express Archive)
-
अमरनाथ यात्रेदरम्यान सर्व भाविकांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे लागणार आहे. (PTI Photo)
-
दोन वर्षांपासून करोना महामारीमुळे ही यात्रा थांबवण्यात आली होती. (फोटो सौजन्य : Amarnath Yatra 2022 / ट्विटर)
-
पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीला त्यांच्या अमरत्वाचे रहस्य (अमर कथा) सांगायचे ठरवले तेव्हा त्यांनी दक्षिण काश्मीरमधील हिमालयातील खोल अमरनाथ गुहा निवडली. (फोटो सौजन्य : Amarnath Yatra 2022 / ट्विटर)
-
गुहा समुद्रसपाटीपासून ३ हजार ८८८ मीटर उंचीवर आहे आणि तिथे फक्त पायी किंवा पोनीने पोहोचता येते. (PTI Photo)
-
यात्रेकरू पहलगामपासून ४६ किमी किंवा बालटालपासून १६ किमी उंच, वळणदार डोंगराच्या पायवाटेने प्रवास करतात. (PTI Photo)

“जो जिता वही सिकंदरमध्ये दीपक तिजोरीने मला किस केलं होतं, त्यानंतर…” फराह खान यांचं वक्तव्य काय?