-
आळंदीत संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाला.
-
संजीवन सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आळंदीत दाखल झाले होते.
-
संजीवन सोहळ्यानिमित्त भाविकांनी माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले.
-
इंद्रायणी घाट वैष्णवांच्या मेळ्याने फुलून गेला होता.
-
सव्वा बाराच्या सुमारास माऊलींच्या संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
-
ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात अवघी आळंदी दुमदुमून निघाली होती.
-
निर्बंधमुक्त सोहळा पार पडत असल्याने आळंदीत लाखो भाविक आल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
-
संजीवन सोहळ्यानिमित्त आळंदीची बाजारपेठ विविध साहित्यांनी सजली होती.
-
माऊलींचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा हा वारकाऱ्यांमध्ये नवचेतना आणणारा असतो.
-
शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येऊ दे, शेतकऱ्यांची भरभराट होऊ दे असे साकडे माऊली चरणी आळंदीत दाखल झालेल्या वारकऱ्यांनी घातले आहे.
-
अवघ्या देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी हाच खरा वारकरी असून त्याची शेती सुजलाम सुफलाम होवो अशी अपेक्षा देखील वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
-
गेल्या पाच दिवसांपासून वारकरी आळंदीत दाखल होत आहेत. ज्ञानोबा माऊली, तुकोबांच्या गजरात अनेक दिंड्या आळंदीत दाखल झाल्या होत्या.

“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल