-
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज म्हणजेच २० मे रोजी देशातील एकूण ६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात ४९ मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. बिहार, जम्मू-काश्मीर, लडाख, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये आज मतदान होत आहे. आजच्या या टप्प्यात मनोरंजन क्षेत्रातील अनेक स्टार्सही मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. कोणत्या स्टार्सने मतदान केले ते पाहूया.
-
मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात बॉलीवूड अभिनेते परेश रावल यांनीही मतदान केले आणि चाहत्यांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. (पीटीआय फोटो)
-
सध्या राजकुमार राव त्याचा आगामी चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस माही’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र, सोमवारी सकाळी सर्व कामे आटोपून तो मुंबईत परतला आणि मतदान केले. (पीटीआय फोटो)
-
राजकुमार रावशिवाय ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटाची अभिनेत्री जान्हवी कपूरही मतदान करण्यासाठी मुंबईत पोहोचली.
-
आज देओल कुटुंबीयही मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. बॉलीवूडचे नट धर्मेंद्र वयाच्या ८८ व्या वर्षी मतदान करण्यासाठी आल्याचे पहायला मिळाले. (पीटीआय फोटो)
-
धर्मेंद्र यांच्याशिवाय त्यांची पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनीही मतदान करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्याच्यासोबत ईशा देओलही दिसली. मतदान केल्यानंतर दोघींनीही कॅमेरासमोर बोटावर शाई लागलेली दाखवत फोटोला पोझ दिली. (पीटीआय फोटो)
-
भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारही मुंबईतील गांधी ग्रामच्या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचला. यादरम्यान अभिनेत्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, मी विकसित भारताला डोळ्यासमोर ठेवून मतदान केले आहे. तो पुढे म्हणाला, “माझ्या देशाचा विकास व्हावा आणि देश सशक्त राहावा अशी माझी इच्छा आहे. हे लक्षात घेऊन मी मतदान केले आहे. नागरिकत्व मिळाल्यानंतर मी पहिल्यांदाच मतदान केले आहे, त्याचा मला आनंद वाटत आहे.” (एएनआय फोटो)
-
त्याचवेळी बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर आणि चित्रपट दिग्दर्शक झोया अख्तर हे देखील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान करण्यासाठी मुंबईत आले होते. मतदान केल्यानंतर फरहान अख्तर म्हणाला, “माझे मत सुशासनासाठी आहे, सर्व लोकांची काळजी घेणाऱ्या सरकारसाठी आहे. कृपया तुम्ही सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करा.” (पीटीआय फोटो)
-
बॉलीवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री श्रिया सरन हिनेही मुंबईतील एका मतदान केंद्रावर मतदान केले. (पीटीआय फोटो)
-
मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडानेही मतदान केले. (पीटीआय फोटो)
-
अभिनेत्री पायल रोहतगी आणि तिचा पती आणि कुस्तीपटू संग्राम सिंग यांनीही मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान केले आणि त्यांच्या शाई लावलेले बोटं दाखवत एक फोटो क्लिक केला. (पीटीआय फोटो)
-
सान्या मल्होत्राही मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचली. यावेळी ती काळ्या रंगाच्या कॅज्युअल आउटफिटमध्ये दिसली.
-
मुंबईतील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान करण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री शोभा खोटे मतदान केंद्रावर पोहोचल्या. (पीटीआय फोटो)
-
अभिनेत्री दिव्या दत्ताही मतदान करण्यासाठी मुंबईतील एका मतदान केंद्रावर पोहोचली. (पीटीआय फोटो)
-
मतदान केल्यानंतर, बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर चाहत्यांसह एक फोटो शेअर केला.
-
बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन पांढऱ्या सूटमध्ये मतदान करण्यासाठी पोहोचली. मतदान केल्यानंतर अभिनेत्री खूप आनंदी दिसत होती. (पीटीआय फोटो)
-
बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरनेही भारताचे नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडले आणि मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचला. (पीटीआय फोटो)
-
बॉलीवूड अभिनेता वरुण धवनही त्याचे वडील डेव्हिड धवनसोबत मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचला. (पीटीआय फोटो)
(हे सुद्धा वाचा: “तेव्हा एकनाथ शिंदे कोणालाच…” संजय राऊत यांनी केले नवे खुलासे; म्हणाले “२०१९ साली जेव्हा…”)

Pakistani man lands in Jeddah Instead of Karachi : जायचं होतं कराचीला, पोहचला थेट सौदी अरेबियात; पाकिस्तानी एअरलाईनचं जगभरात हसू, नेमकं काय घडलं?