-
सातव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून सार्वत्रिक निवडणुकीचा शेवटच्या मतदान प्रक्रियेसाठी संपूर्ण भारत उत्सूक आहे. दरम्यान, सर्व प्रचार सभा, रॅली, मुलाखती संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्यानधारणेला बसले आहेत.
-
कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरिअलमधील ध्यान मंडपम येथे त्यांनी ध्यान करण्यास सुरुवात केली आहे. याच ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केले होते. ते १ जूनपर्यंत येथे ध्यानधारणा करणार आहेत.
-
पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीनेही त्याच ठिकाणी एका पायावर ध्यान केले होते आणि ती भगवान शंकराची वाट पाहत होती.
-
हे भारताचे दक्षिणेकडील टोक आहे.हे ते ठिकाण आहे जेथे भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीला मिळते. हे हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र यांचे मिलन बिंदू आहे. कन्याकुमारी येथे जाऊन पंतप्रधान मोदी राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश देत आहेत.
-
१ जून रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अंतिम टप्प्यासाठी पंतप्रधान मोदींनी गुरुवारी पंजाबमधील होशियारपूर येथे आपल्या निवडणूक प्रचाराची सांगता केली.
-
पंतप्रधानांनी ७५ दिवसांत रॅली आणि रोड शोसह सुमारे २०६ निवडणूक प्रचार कार्यक्रम आयोजित केले. वेगवेगळ्या बातम्या आणि मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी सुमारे ८० मुलाखतीही दिल्या.
-
इंडिया टुडे ने दिलेल्या वृत्तानुसार, या काळात ते मौन राहणार असून केवळ नारळाचं पाणी, द्राक्षांचा रस किंवा तत्सम पदार्थांचा आहार ते घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १ जूनच्या सायंकाळपर्यंत ध्यान करणार असून त्यानंतर ते दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे.
-
महत्त्वाचे म्हणजे या दोन दिवसांत प्रवाशांना कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर जाण्यात बंदी घालण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार ते शनिवार हा समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
कन्याकुमारीच्या रॉक मेमोरियल येथे ध्यान केल्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी भारतासाठीचे आपले विचार व्यक्त केले होते.
-
या जागेचा स्वामी विवेकानंद यांच्यावर फार प्रभाव पडला होता. ज्याप्रकारे सारनाथी भूमी गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाचा दुवा मानली जाते, त्याचप्रकारे कन्याकुमारीतील टेकड्यांचे विवेकानंद यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले जाते.
-
देशभरात प्रवास केल्यानंतर स्वामी विवेकानंद याठिकाणी आले होते, त्यांनी तीन दिवस याठिकाणी ध्यान केले होते.
-
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचार गुरुवारी सायंकाळी संपुष्टात आला. या टप्प्यात सात राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघांमध्ये उद्या, शनिवारी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या या अंतिम टप्प्यात ९०४ उमेदवार रिंगणात आहेत. (सर्व फोटो – @BJP4India/X)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक