-
इस्रायल आणि इराणमधील युद्ध अधिक तीव्र होत चालले आहे. या युद्धाचा परिणाम जगावरही होत आहे. दरम्यान, इराणकडे अण्वस्त्रे आहेत की नाहीत असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस)
-
जगात असे ५७ इस्लामिक देश आहेत ज्यांच्याकडे स्वतःचे सैन्य आहे आणि धोकादायक शस्त्रे देखील आहेत. पण ५७ इस्लामिक देशांपैकी किती देशांकडे अण्वस्त्रे आहेत हे माहितीय का? (छायाचित्र: फ्रीपिक)
-
अण्वस्त्रे ही सर्वात धोकादायक शस्त्र म्हणजे अण्वस्त्रे मानली जातात. अण्वस्त्रे संपूर्ण पृथ्वी नष्ट करू शकतात. युरेनियम किंवा प्लुटोनियम सारख्या पदार्थांपासून बनवलेली अण्वस्त्रे सध्या जगातील फक्त नऊ देशांकडे आहेत. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
रशियाकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत. SIPRI च्या अहवालानुसार, रशियाकडे ५,४५९ अण्वस्त्रे आहेत. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस)
-
या अहवालानुसार, जगातील सर्वात शक्तिशाली देश, अमेरिकेकडे तब्बल ५,१७७ अण्वस्त्रे आहेत. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
जगातील ५७ इस्लामिक देशांपैकी फक्त एकाच मुस्लिम देशाकडे अण्वस्त्रे आहेत. तो देश म्हणजे पाकिस्तान (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
इराणकडे सध्या अण्वस्त्रे नाहीत पण त्यांच्याकडे युरेनियमचा साठा आहे. गेल्या काही काळापासून इराण सातत्याने त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर काम करत आहे, ज्यामुळे जगभरात चिंता पसरली आहे. प्रामुख्याने इस्रायल या अणू कार्यक्रमावर सुरुवातीपासून लक्ष ठेवून आहे. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
इराणव्यतिरिक्त, कझाकस्तानमध्येही मोठ्या प्रमाणात युरेनियम उत्पादन होते. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
या देशांकडे अण्वस्त्रे आहेत
जगातील नऊ देशांकडे अण्वस्त्रे आहेत, ज्यामध्ये अमेरिका, रशिया, पाकिस्तान, चीन, फ्रान्स, ब्रिटन, भारत, उत्तर कोरिया आणि इस्रायल यांचा समावेश आहे. (फोटो: फ्रीपिक)

PM Modi: अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींना इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा फोन; मोदी म्हणाले, “सध्याची परिस्थिती…”