-
Rajya Sabha Nomination : राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर आज (१३ जुलै) चार जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून ही नियुक्ती करण्यात आली आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांची आज (१३ जुलै) राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांच्यासह आणखी तिघांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्टर, शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचीही राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
Who Is C Sadanandan Master : सी सदानंद मास्टर केरळमधील सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षणतज्ज्ञ आहेत. सी सदानंदन मास्टर यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याने त्यांच्या योगदानाचं कौतुक होत आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
Who Is Harsh Vardhan Shringla : हर्षवर्धन श्रृंगला यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे. ते भारताचे माजी परराष्ट्र सचिव आहेत. ते १९८४ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी अमेरिका, बांगलादेश, थायलंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिलेलं आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
Who Is Meenakshi Jain : मीनाक्षी जैन यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे. मीनाक्षी जैन या प्रसिद्ध इतिहासकार आहेत. तसेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांना भारतीय इतिहास संशोधनासाठी ओळखलं जातं.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
Who is Ujjwal Nikam : उज्ज्वल निकम यांचीही राज्यसभेवर नियुक्ती झाली आहे. ते प्रसिद्ध सरकारी वकील आहेत. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहचवण्यापर्यंत वकील उज्वल निकम यांची मोलाची भूमिका राहिली होती. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

Chhangur Baba Racket: हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यासाठी शेकडो लोकांची फौज तयार केली; छांगूर बाबा आंतरराष्ट्रीय निधीचा कसा वापर करायचा?