-
Shiv Sena MLA Dispute : सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आज शिवसेना (ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे) या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. (फोटो-विधानसभा टीव्ही स्क्रिनशॉट)
-
ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यामध्ये सभागृहात झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर काही वेळासाठी सभागृह तहकूब करावं लागलं. (फोटो-विधानसभा टीव्ही स्क्रिनशॉट)
-
आमदार वरुण सरदेसाई यांनी मुंबईमधील वांद्रे येथील संरक्षण जमिनीवरील झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. (फोटो-विधानसभा टीव्ही स्क्रिनशॉट)
-
त्या प्रश्नावर मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं. मात्र, जे छापील उत्तर आहे तेच दिलं, मी समजू शकतो असं म्हणत वरुण सरदेसाई यांनी मंत्री देसाई यांना टोला लगावला. (फोटो-विधानसभा टीव्ही स्क्रिनशॉट)
-
तसेच तुम्ही किती वेळा पत्र-पत्र खेळत बसणार आहात? आम्हाला कालमर्यादा सांगा. येत्या किती दिवसांत हा प्रश्न मार्गी लागेल हे सांगा असं वरुण सरदेसाई यांनी म्हटलं.(फोटो-विधानसभा टीव्ही स्क्रिनशॉट)
-
वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्या काळातील सरकारचा उल्लेख केला. (फोटो-विधानसभा टीव्ही स्क्रिनशॉट)
-
मंत्री देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्या काळातील सरकारचा उल्लेख केल्यामुळे वरुण सरदेसाई संतापले. त्यानंतर मंत्री देसाई हे देखील त्यांच्यावर चांगलेच भडकले. (फोटो-विधानसभा टीव्ही स्क्रिनशॉट)
-
मंत्री देसाई म्हणाले की, “आमची लाज काढू नका. तुम्ही काय केलं ते सांगा? आमची काय लाज काढता? तुम्ही काहीच काम केलं नाही. आम्ही काम केलं आहे”, असं म्हणत शंभूराज देसाई वरुण सरदेसाई यांच्यावर भडकले. (फोटो-विधानसभा टीव्ही स्क्रिनशॉट)
-
दरम्यान, आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांनी देखील शंभूराज देसाई यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये काही वेळ शाब्दित चकमक रंगल्याचं पाहायला मिळालं. (फोटो-विधानसभा टीव्ही स्क्रिनशॉट)

Jayant Patil : “मी एक मुख्य सेनापती होतो…”, जयंत पाटलांचं भावनिक भाषण चर्चेत; म्हणाले, “मी जातोय, पण…”