-
Ajit Pawar Beed Visit : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्पष्टवक्ता आणि धडाडीचे नेते म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या कामाचा वेग आणि स्पष्ट बोलण्याच्या पद्धतीमुळे ते नेहमी चर्चेत असतात. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
उपमुख्यमंत्री अजित पवार हे शासकीय अधिकाऱ्यांवर कामात कुचराई केल्यामुळे अनेकदा संतापल्याचेही पाहायला मिळालेले आहेत. अनेकदा ते अधिकाऱ्यांना सुनावतातही. (फोटो-अजित पवार सोशल मीडिया)
-
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विकासकामांचं उद्धघाटन केलं आहे. (फोटो-अजित पवार सोशल मीडिया)
-
दरम्यान, बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका व्यक्तीने प्रश्न विचारताच चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. (फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
नेमकं काय झालं? : उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका विकासकामाची पाहणी करत होते. मात्र, याचवेळी समोरील एका व्यक्तीने रोडचं काम होणार की नाही? असा प्रश्न विचारला.(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
त्या प्रश्नानंतर अजित पवार संतापले आणि म्हणाले की, “जरा थांबा ना, मला एक कळत नाही. याआधी कोणीही लक्ष दिलं नाही. आता पालकमंत्री म्हणून मी लक्ष देतोय, पैसे आणतोय, जरा मदत करा.”(फोटो-संग्रहित छायाचित्र)
-
“आपल्याला सर्व काम करायचंय. पण माझ्याकडेही जादूची कांडी नाही, तुम्ही सहकार्य करा, मी सहकार्य करतो. नाहीतर मी जातो, मग घ्या पालकमंत्री कोणाला घ्यायचं ते”, अशा शब्दांत अजित पवारांनी सुनावलं. (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
दरम्यान, रस्त्याच्या संदर्भातील प्रश्न मांडणाऱ्या व्यक्तीला कडक शब्दांत सुनावल्यानंतर अजित पवार यांनी संयमाचा आणि एक-एक काम मार्गी लावण्याचा सल्ला दिला. (फोटो-अजित पवार सोशल मीडिया)
-
दरम्यान, पुण्यात काही दिवसांपूर्वी एका युवकाने नोकरीतील अडचणीबाबतचा एक प्रश्न विचारला होता. तेव्हाही अजित पवार त्या युवकावर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले होते. (फोटो-अजित पवार सोशल मीडिया)

“मोठी किंमत मोजावी लागेल, पण…”, ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफवर पंतप्रधान मोदींचं सडेतोड उत्तर