-
Minimum Balance : आयसीआयसीआय बँकेने नवीन बचत खात्यांसाठी किमान मासिक सरासरी शिल्लक रकमेची मर्यादा मोठ्या प्रमाणात वाढवण्याची घोषणा केली होती. मात्र, बँकेच्या या निर्णयावर देशभरातून टीका झाली. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
ICICI Bank Minimum Balance: त्यानंतर अखेर आयसीआयसीआय बँकेने १३ ऑगस्ट रोजी किमान शिल्लक रकमेच्या नियमांत सुधारणा करत ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
ICICI Bank Minimum Balance: बँकेच्या निर्णयावर देशभरातून टीकेची झोड उठल्यानंतर अखेर बँकेने महानगर, शहरी आणि निमशहरी भागातील ग्राहकांसाठी किमान ५०,००० रुपयांची शिल्लक ठेवण्याची अट रद्द केली. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
ICICI Bank Balance: बँकेच्या ५०,००० रुपयांची शिल्लक ठेवण्याच्या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर बँकेने हा निर्णय रद्द करत शिल्लक रकमेच्या नियमता बदल केले आहेत. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
ICICI Bank Balance: आयसीआयसीआय बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, शहरी आणि महानगरीय क्षेत्रांसाठी किमान शिल्लक रक्कम ५० हजारांवरून कमी करून १५ हजार एवढी केली आहे. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
ICICI Bank Balance: तसेच आयसीआयसीआय बँकेने निमशहरी भागांसाठी आयसीआयसीआय बँकेच्या बचत खात्यातील किमान शिल्लक रक्कम ७,५०० रुपये करण्यात आली आहे.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
ICICI Bank Balance: ग्रामीण भागांसाठी आयसीआयसीआय बँकेला आवश्यक असलेली किमान मासिक शिल्लक २,५०० एवढी करण्यात आली. ग्रामीण ग्राहकांकडून बँकेला आवश्यक असलेल्या पूर्वीच्या किमान शिल्लक रकमेपेक्षाही ही रक्कम कमी आहे.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
ICICI Bank Balance: नवीन परिपत्रकानुसार, शहरी आणि महानगरांतील ग्राहकांसाठी खात्यात किमान सरासरी शिलकीची मर्यादा रक्कम १५,००० रुपये करण्यात आली. याआधी ही रक्कमेची मर्यादा १०,००० होती. त्यात आता ५,००० रुपयांची वाढ झाली आहे.(फोटो-इंडियन एक्स्प्रेस)
-
ICICI Bank Balance: आयसीआयसीआय बँकेने निम शहरी आणि ग्रामीण ग्राहकांना अनुक्रमे २५,००० आणि १०,००० रुपये किमान शिल्लक ठेवण्याची अटही रद्द केली. त्याऐवजी आता अनुक्रमे ७,५०० रुपये आणि २,५०० रुपये किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागेल. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

Jagdeep Dhankhar: राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे होते? अखेर समोर आला माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा