-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील झारसुगुडा येथे ६०,००० कोटींहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला. या प्रकल्पांमध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधांची वाढ आणि समुदायांना सक्षम करण्यासाठी उच्च शिक्षणाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. (Photo Source by PTI)
-
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान डिजिटल भारत निधी अंतर्गत ३७,००० कोटी खर्चून स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधलेले ९७,५०० हून अधिक बीएसएनएल ४ जी मोबाइल टॉवर्सचं उद्घाटन केलं. (Photo Source by PTI)
-
यामुळे भारताचा स्वीडन, डेन्मार्क, दक्षिण कोरिया आणि चीन या निवडक राष्ट्रांच्या गटात प्रवेश झाला आहे जे क्लाउड-आधारित, ऊर्जा-कार्यक्षम डिझाइनसह स्वतःची दूरसंचार उपकरणे तयार करतात.(Photo Source by PTI)
-
४ जी सॅच्युरेशन प्रकल्पाचं उद्दिष्ट देशभरातील २६,७०० पूर्वी सेवा न मिळालेल्या गावांना जोडणं आहे. ज्यामध्ये ओडिशातील २,४७२ गावांचा समावेश आहे. ज्यामुळेदोन दशलक्ष नवीन ग्राहकांना कनेक्टिव्हिटीचा फायदा होईल. (Photo Source by PTI)
-
भारतात बनवलेले ४ जी नेटवर्क सहजपणे ५ जीमध्ये अपग्रेड करता येते यावर मोदींनी भर दिला. ते भारतातील डिजिटल दरी कमी करण्यासाठी आणि ग्रामीण समुदायांना सक्षम बनवण्यासाठी एक पाऊल असल्याचं म्हटलं.(Photo Source by PTI)
-
पंतप्रधान मोदी म्हणाले की तंत्रज्ञान केवळ वेगाबद्दल नाही तर सक्षमीकरणाबद्दल आहे. जेव्हा गावे जोडली जातात तेव्हा लोकांची स्वप्ने देखील जोडली जातात.(Photo Source by PTI)
-
दूरसंचार विस्ताराबरोबरच पायाभूत सुविधा आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील नवीन प्रकल्पांचं पंतप्रधानांनी अनावरण केलं. ज्यामुळे अर्थव्यवस्था आणि तरुणांच्या आकांक्षा दोन्ही मजबूत करण्याच्या त्यांच्या सरकारच्या वचनबद्धतेला बळकटी मिळते.(Photo Source by PTI)
-
बीएसएनएलच्या रौप्यमहोत्सवी समारंभाचा एक भाग असलेल्या या उपक्रमामुळे शिक्षण, आरोग्यसेवा आणि उद्योजकतेमध्ये, विशेषतः भारतातील दुर्गम आणि ग्रामीण भागात नवीन संधी उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. (Photo Source by PTI)
-
जून २०२४ मध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर गेल्या १५ महिन्यांत मोदींचा हा सहावा ओडिशाचा दौरा आहे. जो प्रादेशिक लक्ष केंद्रित करण्याचं संकेत देतो.(Photo Source by PTI)
-
मोदींचा हा सात वर्षांत झारसुगुडा येथील पहिलाच दौरा आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये त्यांचा शेवटचा दौरा होता. जेव्हा त्यांनी ओडिशाच्या दुसऱ्या व्यावसायिक विमानतळाचं उद्घाटन केलं होतं.(Photo Source by PTI)

Jitendra Awhad: नीट बोलायचं, नाही तर गुन्हे दाखल करेल… जितेंद्र आव्हाडांसमोरच उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ओएसडीची पुढाऱ्यांना धमकी