-
करोना विषाणूंनी जगाचं चित्रचं बदलून टाकलं आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं असून, लॉकडाउनमध्ये लोकांना राहण्याची वेळ ओढवली आहे. भारतातील अशीच काहीशी परिस्थिती आहे. देशात अनेक राज्यांमध्ये करोनाचा प्रसार वाढत असल्यानं रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. (सर्व फोटो -इंडियन एक्स्प्रेस)
-
सध्या भारतासह जगभरात करोना लसीच्या चाचण्या सुरू आहेत. या चाचण्या सुरू असतानाच्या काळातच संशोधकांना आणखी एक यश मिळालं आहे. संशोधकांनी २१ औषधांचा शोध लावला आहे, ज्या करोना विषाणूंच्या वाढीला नियंत्रित करतात.
-
या २१ औषधी करोना विषाणूंची निर्मिती (प्रजनन वाढ) थांबवतात. त्यामुळे शरीरातील करोना विषाणुंची वाढ नियंत्रणात येऊ शकते. अमेरिकेतील सॅनफोर्ड बर्नहम प्रीबाईस मेडिकल डिस्कव्हरी इन्स्टिट्यूटनं हा शोध लावला आहे.
-
संशोधकांच्या या शोधामुळे करोनावरील उपचारासाठी मदत होऊ शकते. संशोधकांनी करोनाचं पुनरुत्पादन थांबवण्याऱ्या औषधींचं विश्लेषण केलं आहे. हे संशोधन नेचर या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधनानुसार २१ औषधी विषाणुंचं पुनरुत्पादन थांबवते आणि या औषधी रुग्णांसाठी घातक नाहीत.
-
यापैकी चार औषधींसोबत रेमडेसिवीर असा उपचार केला जाऊ शकतो, असं या संशोधकांनी म्हटलं आहे.
-
सॅनफोर्ड इन्स्टिट्यूटमध्ये इम्युनिटी प्रकल्पाचे संचालक असलेले सुमित चंदा यांनी या संशोधनाविषयी माहिती दिली. "रेमडेसिवीर औषधीमुळे रुग्णालयातील रुग्ण कमी वेळेत बरे होऊ शकतात. मात्र, सगळ्यांच रुग्णांसाठी हे औषध परिणामकारक ठरत नाही. सध्या स्वस्थ, परिणामकारक व सहज उपलब्ध होऊ शकतील अशा औषधींचा शोध घेतला जात आहेत. या औषधी रेमडेसिवीर या औषधाला पुरक असतील आणि त्या लक्षणं दिसू लागताच रुग्णाला देता येतील."
-
करोनामुळे रुग्णाच्या फुफ्फुसावर परिणाम होतो. त्यावर ही औषधी प्रभावी आहेत का याचीही चाचणीही संशोधकांनी केली आहे. त्याचबरोबर रेमडेसिवीर इतर औषधामुळे होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास करण्यात आला आहे. संशोधकांना असं दिसून आलं की, या २१ पैकी १३ औषधींच्या वैद्यकीय चाचण्या आधीच सुरू झालेल्या आहेत. या औषधी करोनावर प्रभावी मानल्या जात आहेत.
-
या २१ औषधींपैकी २ औषधींना अमेरिकेच्या फूड अॅण्ड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनकडून परवानगी देण्यात आली आहे. Astemizole व Clofazamine अशी या औषधींची नावं आहेत. तर रेमडेसिवीर अत्यावश्यक वेळी वापरण्यास परवानगी देण्यात आली.
-
सुमित चंदा म्हणाले,"हा संशोधन अभ्यास करोना रुग्णांसाठीच्या संभाव्य असलेल्या पर्यायांविषयी आहे. हा अहवाल करोना महामारीविरोधात लढण्यासाठी वैज्ञानिकांना महत्त्वाचा ठरू शकतो.
-
सध्या या २१ औषधांची चाचणी प्राण्यांवरती सुरू असून, चाचण्या यशस्वी झाल्या तर संशोधक या औषधांच्या क्लिनिकल ट्रायलसाठी फूड अॅण्ड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशनकडून परवानगी घेणार आहे. (सर्व फोटो -इंडियन एक्स्प्रेस)

पुढच्या वर्षी बाप्पा उशिरा येणार! ‘या’ तारखेला साजरी केली जाईल गणेश चतुर्थी