-
जगाला वेठीस धरणाऱ्या करोनावर मात करण्यासाठी आशेचा किरण दिसत असतानाच या विषाणूनं जगाला खडबडून जागं केलं आहे. जगभरात सध्या करोनाची लस आल्यानं उत्साहाचं वातावरण असून, निराशेचे ढग दूर होताना दिसत असतानाच ही बातमी समोर आली आहे. (छायाचित्र/एपी)
-
आतापर्यंत लक्षणं वाढत गेलेल्या करोनाचा एक नवा प्रकार समोर आला आहे. करोनानं स्वरूप बदललं असून, करोनाच्या या नव्या प्रकाराचा प्रसाराचा वेग प्रचंड असल्यानं ब्रिटनं हादरलं आहे. वेगळ्या स्वरूपाच्या या करोनामुळे लोक वेगानं संक्रमित होत असून, ब्रिटननं प्रसार रोखण्यासाठी पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू केला आहे. (छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)
-
साधारणतः विषाणू सतत आपलं रुप बदलत असतात. त्यालाच इंग्रजीमध्ये म्युटेट करणं असं म्हटलं जात. त्यामुळे आजारांच्या विषाणूंवर शास्त्रज्ञांकडून नजर ठेवली जाते. करोना विषाणूनंही स्वरूप बदललं असून, नवा प्रकार बघायला मिळत आहे. (छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)
-
करोनाच्या या नव्या प्रकारामुळे जगभर चिंता पसरली आहे. त्याच कारण म्हणजे हा विषाणून प्रचंड वेगाने स्वरूप बदल आहे. असं म्हटलं जात आहे की, विषाणूच्या महत्त्वाच्या भागात हा बदल होत आहे. प्रयोगशाळेमध्ये निरीक्षण करण्यात आलेल्या काही म्युटेशन्समध्ये असं दिसून आलं की, त्यांची मानवी पेशी संक्रमित करण्याची क्षमता वाढत आहे. (छायाचित्र/रॉयटर्स)
-
यामुळेच जगाची चिंता वाढली आहे. कारण करोनाचा हा प्रकार अधिक वेगानं प्रसारित होण्याकडे इशारा करत आहे. हा अद्याप अंदाज असून, अजून याविषयी ठोसपणे वैज्ञानिकांनी भाष्य केलेलं नाही. (छायाचित्र/एपी)
-
करोनाच्या हा नवीन प्रकार सर्वात आधी सप्टेंबर आढळून आला. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये लंडनमध्ये एक चतुर्थांश रुग्ण या नव्या प्रकाराने संक्रमित झालेले आढळून आले. डिसेंबरच्या मध्यावधीपर्यंत दोन तृतीयांशी रुग्णसंख्येत करोनाचा नवीन प्रकार आढळून आला. (छायाचित्र/एपी)
-
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी याविषयी बोलताना म्हटलं की, "तूर्तास याविषयी ठोस माहिती नाही. पण हे करोना संक्रमणाचं कारण बनत आहे. पूर्वीपेक्षा ७० टक्के अधिक संक्रमण होऊ शकतं. आताच त्याविषयी बोलणं घाईचं होईल. पण आम्ही जे बघितले आहे, त्यावरून असं दिसतंय की पूर्वीच्या प्रकारांपेक्षा हा विषाणूनं वेगानं पसरत चालला आहे. त्यावर नजर ठेवणं गरजेचं आहे," अशी भीती जॉन्सन यांनी व्यक्त केली आहे. (छायाचित्र/एपी)
-
उत्तर आयर्लंड वगळता संपूर्ण ब्रिटनमध्ये हा व्हायरस पसरला आहे. महत्त्वाचं म्हणजे लंडन आणि दक्षिण आणि पूर्व इंग्लंडमध्ये करोनाच्या नव्या प्रकाराचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. जेनेटिक कोडचा अभ्यास करणाऱ्या नेक्सस्ट्रेन या संस्थेच्या आकडेवारी असं दिसून येतं की डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियामध्येही हा व्हायरस आढळून आला आहे. (छायाचित्र/एपी)
-
नेदरलँडमध्येही करोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. दक्षिण आफ्रिकेतही व्हायरसच्या या नव्या प्रकाराशी मिळता जुळता एक व्हायरस आढळून आला आहे. पण, त्याचा ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या व्हायरसशी संबंध नसल्याचं सांगितलं जात आहे. (छायाचित्र/एपी)
-
नव्या व्हायरसमुळे सध्या तयार करण्यात आलेल्या करोना लसींच्या परिणामाबद्दल प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. ब्रिटनमध्ये तीन लसींना मान्यता देण्यात आलेली आहे. त्यांचा परिणाम या विषाणूवर होऊ शकतो. कारण या लसींमुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे या व्हायरसवर मात करता येऊ शकते. मात्र, कँब्रिज विद्यापीठातील प्रा. रवि गुप्ता यांनी या व्हायरसला म्युटेट (नवं रुप) होऊ दिलं तर चिंता वाढू शकते. हा व्हायरस लसींपासून वाचण्याच्या सीमेवर आहे. तो त्या दिशेनं जाऊ लागला आहे," असं गुप्ता यांनी म्हटलं आहे. (छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस)

उद्धव ठाकरे यांना धक्का, शिवसेनेच्या माजी आमदारांच्या पत्नी शिंदे गटात