-
करोनाच्या भयाखालीच यंदाचा नाताळ जगभरात साजरा झाला. नाताळाच्या सणाला गालबोट लावणारी एक घटना समोर आली आहे. एका केअर होम केंद्रात करोनाग्रस्त सांता क्लॉज आल्यानं केअर होममध्ये वास्तव्यास असलेल्या १२१ जणांसह ३६ कर्मचाऱ्यांना करोना संसर्ग झाला. त्यातील १८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. (photo_Reuters)
-
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार बेल्जियमध्ये ही घटना घडली आहे. दोन आठवड्यांपूर्वी सांता क्लॉज आपल्या काही साथीदारांसह बेल्जियमच्या एन्टवर्प केअर होममध्ये आला होता. केअर होममधील करोना रुग्णांची संख्या अचानक वाढल्यानंतर सांता क्लॉजमुळे करोना पसरल्याचं पुढे आलं. (photo_Designed by Gargi Singh)
-
२४ व २५ डिसेंबर रोजी केअर होममध्ये राहणाऱ्या पाच लोकांचा मृत्यू झाला. तर एका व्यक्तीला ऑक्सिजन लावण्यात आला. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार केअर होमला भेट दिल्याच्या तीन दिवसानंतर सांता क्लॉज करोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. (photo_Reuters)
-
"केअर होमसाठी हा काळा दिवस आहे. पुढील दहा दिवसही अवघड असणार आहेत. सांता क्लॉज केअर होममध्ये आला तेव्हा नियमांचं पालन करण्यात आलं होतं, असं महापौर विम किअर्स यांनी म्हटलं होतं. मात्र, छायाचित्रातून असं दिसून आलं की, नियमांचं पालन केलं गेलं नाही. (photo_Reuters)
-
बेल्जियममधील प्रसिद्ध व्हायरालॉजिस्ट मार्क वॅन रेन्स्ट यांनी या घटनेबद्दल भाष्य केलं आहे. "मला शंका आहे की, सांता क्लॉजमुळेच इतक्या मोठ्या संख्येने लोक संक्रमित झाले असावे. केअर होममध्ये हवा खेळती नसल्यामुळेही करोना पसरला, असंही ते म्हणाले. (photo_Reuters)

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”