-
देशामध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने तीन लाखांहून अधिक करोना रुग्ण आढळून येत आहेत. देशात अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू लागली आहे. रेमडेसिवीर तसंच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र देशभरातील अनेक भागांमध्ये दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर दीड आठवड्यांपूर्वी टाटा उद्योग समुहाने दोन दिवसांपूर्वीच पुढाकार घेत २००-३०० टन ऑक्सिजन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सुरुवात केलीय.
-
मात्र मंगळवारी, (२० एप्रिल २०२१ रोजी) पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवहानानंतर आता टाटा ग्रुपने थेट परदेशातून भारतीयांसाठी सुविधा आयात करण्याचा निर्णय घेतला
-
टाटा ग्रुपने मोठ्या आकाराचे २४ ऑक्सिजन वाहक सिलेंडर्स आयात करण्याचा निर्णय घेत यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन देण्यात आली होती.
-
आम्ही टाटा कंपनीकडून भारतातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जे प्रयत्न शक्य आहेत ते सर्व करण्यास कटीबद्ध आहोत. ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी आम्ही असाच एक निर्णय घेतला आहे, असं ट्विट टाटा ग्रुपच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं होतं.
-
ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकर हे द्रव्य स्वरुपातील ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी वापरले जातात.
-
देशाला संकटकाळामध्ये मदत करण्याच्या शब्द दिल्यानंतर अवघ्या चार दिवसात म्हणजेच शनिवारी टाटा ग्रुप्सने भारतीय हवाई दलाच्या मदतीने चार ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकर भारतात आणले आहेत. यासंदर्भातील माहिती कंपनीनेच ट्विटरवरुन फोटो शेअर करत दिलीय.
-
टाटा समुहाने मदत म्हणून देऊ केलेले चार ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकर सिंगापूरवरुन वेळेत निघाले आहेत, असं कंपनीने फोटो शेअर करताना म्हटलं आहे.
-
भारतीय हवाईदल, सिंगापूरमधील भारतीय दुतावास, सिंगापुरचे संरक्षण मंत्रालय, सिंगापूरमधील नागरी हवाई उड्डाण मंत्रालय तसेच सिंगापूरमधील लिंडी गॅस प्राव्हेट लिमिटेड या कंपनीच्या एकत्र कामामधून हे शक्य झाल्याचं कंपनीने म्हटलं आहे.
-
हे टँकर्स आणण्यासाठी भारतीय हवाई दलाने विशेष विमान सिंगापूरला पाठवलं होतं.
-
चँगी विमानतळावरुन हे ऑक्सिजन क्रायोजेनिक टँकर भारतीय हवाई दलांच्या विमानातून भारतात पाठवण्यात आले आहेत.
-
शनिवारी हे टॅकर सिंगापूरमधून भारतात पाठवण्यात आले.
-
सिंगापूरमधील अनेक अधिकारी आणि भारत सरकारच्या मदतीने हे टँकर भारतात आणण्यात आलेत.
-
या टँकर्सची मदत देशातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी होणार आहे.
-
असे अजून २० टँकर टाटा समुहाकडून भारतात आणले जाणार आहेत.
-
रतन टाटांनी इन्स्टाग्रामवरुन यासंदर्भातील स्टोरी शेअर करत माहिती दिली होती.
-
२००-३०० टन ऑक्सिजन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची घोषणा टाटा कंपनीकडून करण्यात आली तेव्हापासूनच रतन टाटांवर कौतुकाचा वर्षाव होत असून त्यांना सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी देवमाणूस असं म्हटलं आहे. समाजसेवा ही टाटांच्या रक्तात आहे असंही काहींनी म्हटलं आहे. तर काहींनी, काहींनी आम्ही देव पाहिला नसला तरी रतन टाटांच्या रुपात देव नक्की पाहिलाय असं म्हटलं आहे. (फोटो सौजन्य: instagram/tatacompanies तसेच ट्विटरवरुन साभार)

Operation Sindoor: ‘जशास तसं उत्तर…’ ऑपरेशन सिंदूरनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका स्पष्ट; भारत-पाकिस्तान तणावावर मोठं विधान!