-
सध्या भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. आतापर्यंत देशात करोनामुळे दोन लाखांहून अधिक मृत्यू झाले असून अनेक ठिकाणी करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. (सर्व फोटो : ट्विटर, रॉयटर्स आणि पीटीआयवरुन साभार)
-
ऑक्सिजन बेड्स, औषधे आणि लसींचा तुटवडा यासारख्या समस्यांबद्दलही सोशल नेटवर्कींगवर जोरदार चर्चा सुरु आहे. करोनामुळे देशातील आरोग्य व्यवस्थेवर कामालीचा ताण पडला असून अनेक ठिकाणी यंत्रणा कोलमडल्यात.
-
२०१३ मध्ये एका ट्विटर युझरने करोना विषाणूचा संसर्ग होईल असं ट्विट केलं होतं. आता हे ट्विट इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत असून ते प्रचंड व्हायरल झालं आहे. हेच ते ट्विट आहे.
-
आता हे ट्विट चर्चेत असण्यामागील करणं ठरणारी गोष्ट पाहा. ती गोष्ट आहे या ट्विटची तारीख. काय आहे तारीख ते नीट पाहा, ३ जून २०१३. एक लाख ५ हजार जाणांनी ते रिट्विट केलं आहे तर ७५ हजारहून अधिक जणांनी ते कोट करुन रिट्विट केलं आहे. दोन लाख २२ हजार जणांनी हे ट्विट लाईक केलं आहे.
-
होय सात वर्षांआधीच यासंदर्भात या व्यक्तीनं भाकित वर्तवलेलं आणि आता हे ट्विट व्हायरल झालं आहे. त्यावर अनेक मजेदार प्रतिक्रिया नोंदवण्यात येत आहेत. पाहुयात अशाच काही मजेदार प्रतिक्रिया.
-
तन्मय भट म्हणतोय कोविनचा एक स्लॉट बूक करुन दे. अर्थात यामधून त्याला भविष्यातील स्लॉट बुकिंग हवं आहे हे स्पष्ट होतंय.
-
अनेकांना तारीख पाहून आश्चर्य वाटलं आहे.
-
हे ट्विट पाहणाऱ्या प्रत्येकाची पहिली रिअॅक्शन
-
मोफत सल्ला दिला होता त्याने असं एकजण मिम्सच्या माध्यमातून म्हणालाय.
-
करोनाचा शोध लागण्याच्या काही महिनेआधी हे ट्विट करण्यात आलं आहे.
-
तुला कसं कळलं?
-
या व्यक्तीला भविष्यात काय होणार हे ठाऊक आहे असं म्हणत अनेकांनी त्याला प्रश्न विचारलेत. भारतीयांनाही भन्नाट प्रश्न विचारलेत. त्यातीलच हा एक प्रश्न, नेट कधी क्लियर होणार?
-
काय २०१३?
-
रॅण्डम ट्विटवर विश्वास ठेवायला सुरुवात करा
-
तारीख तर बघा…
-
आरसीबी कधी जिंकणार असा प्रश्न एकाने विचारलाय.
-
मित्रा कधी जाणार करोना ते सुद्धा सांग असं काही जण म्हणतायत.
-
एवढाच हुशार आहेस तर जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीची तारीख सांग, असं एक भारतीय म्हणालाय.
-
हा कदाचित करोनामुळे दगावला असेल अशी शक्यता एकाने व्यक्त केलीय.
-
वाचून अंगावर काटा आला
-
जोफ्रा आर्चर गोंधळला असणार…
-
कोणय हा?
-
या ट्विटवरुन संभ्रम आणखीन वाढल्याचं एकजण म्हणतोय.
-
सीएए आणि एनआरसीचं काय होणार असा प्रश्न एकाला पडलाय.
-
हे ट्विट करणाऱ्या व्यक्तीचं नाव मॅक्रो असं आहे. त्याने शेवटचं ट्विट २०१६ साली केलं आहे. तो ट्विटरवर ज्या वर्षी त्याने हे करोनासंदर्भातील सध्या चर्चेत असणारं ट्विट केलं त्याच वर्षी आल्याचं प्रोफाइलवरुन दिसतंय. त्याने मार्च २०१३ ला ट्विटर जॉइन केलं आहे. सध्या अचानक त्याच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झालीय.

ना मालिका संपणार, ना लीप येणार…; ‘ठरलं तर मग’मध्ये पुढे काय घडणार? जुई गडकरी पोस्ट शेअर करत म्हणाली…